मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या 4086 कुटुंबांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सुमारे चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज ?(22 मे) सोमवारपासून मुंबईकरांना म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहेत. 18 जुलै रोजी म्हाडाच्या मुंबईत तयार झालेल्या 4086 घरांची लॉटरी निघणार आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदार सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून म्हणजेच 22 मे पासून ऑनलाइन किंवा म्हाडाने तयार केलेल्या अँपद्वारे नोंदणी करू शकतात.
नोंदणीची प्रक्रिया 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अर्जदार 26 जून रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अनामत रक्कम जमा करू शकतात. 2019 मध्ये म्हाडाने मुंबईतील घरांसाठी शेवटची लॉटरी काढली होती. मागील 4 वर्षांपासून मुंबईतील घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा लोकं करत आहे.
यावेळी परवडणाऱ्या घरांसोबतच आलिशान घरांचाही लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. लॉटरीत सर्वात महागड्या घराची किंमत सुमारे सात कोटी रुपये आहे. ताडदेव कॉम्प्लेक्समध्ये हे घर सुमारे 1500 स्क्वेअर फूट आहे. त्याचबरोबर जुहू कॅम्पसमधील एका घराची किंमत सुमारे 4 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. लॉटरीत सर्वात लहान घराची किंमत सुमारे 28 – 34 लाख रुपये आहे. विक्रोळीतील हे घर सुमारे 270 स्क्वेअर फूट आहे.
गोरेगावात सर्वाधिक घरे..
लॉटरीत दादर, परळ, विक्रोळी, अंधेरी, जुहू, अँटॉप हिल आणि इतर कॅम्पसमधील घरांचा समावेश आहे. मात्र गोरेगावमध्ये बांधण्यात आलेल्या 1800 घरांपैकी बहुतांश घरांचा लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. म्हाडाच्या इमारतींमध्ये प्रथमच जिम, स्विमिंग पूलसह इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे..
7 कोटींचे आलिशान घरही असणार..
जुलैमध्ये काढण्यात येणारी म्हाडाची लॉटरी अनेक अर्थांनी वेगळी आहे. परवडणाऱ्या घरांसोबतच आलिशान घरांचाही लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, लॉटरीत सर्वात महागड्या घराची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. ताडदेव कॉम्प्लेक्समध्ये हे घर सुमारे 1500 स्क्वेअर फूट आहे. त्याचबरोबर जुहू कॅम्पसमधील एका घराची किंमत सुमारे 4 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. लॉटरीत सर्वात लहान घराची किंमत सुमारे 34 लाख रुपये आहे. विक्रोळीतील हे घर सुमारे 270 स्क्वेअर फूट आहे..
म्हाडाची लॉटरी प्रक्रिया होणार हायटेक..
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनच केली जाणार आहे. लॉटरी निघण्यापूर्वी अर्जदारांची कागदपत्रेही ऑनलाइन तपासली जातील, जेणेकरून लॉटरी निघाल्यानंतर काही दिवसांतच सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून विजेत्याच्या हाती चाव्या सुपूर्द करता येतील. म्हाडाने अनिवार्य कागदपत्रांची संख्याही कमी केली आहे. लॉटरी सॉफ्टवेअर अपडेट करून म्हाडाने आवश्यक कागदपत्रांची संख्या 7 वर आणली आहे. यापूर्वी लॉटरीसाठी 21 कागदपत्रांची आवश्यकता होती..
हे कागदपत्र तयार ठेवा..
आधार कार्ड
पॅन कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
प्रतिज्ञापत्र
जात प्रमाणपत्र
(आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या संबंधित कोट्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवा)
अर्ज कसा कराल ?
विक्रीकरता उपलब्ध असलेल्या सर्व सदनिकांबाबत विस्तृत माहिती म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https ://housing.mhada. gov.in तसेच https://www. mhada.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे इच्छुक अर्जदारांनी सहभाग घेण्याकरता याच संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन बोरीकर यांनी केले आहे. संगणकीय सोडतीकरता वापरण्यात येणारी संगणकीय आज्ञावलीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
अर्जदारांनी मार्गदर्शनासाठी 022-69468100 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.
एकूण सदनिका – 4083
॥ अत्यल्प – 2790
॥ अल्प – – 1034
॥ मध्यम – 139
॥ उच्च – 120
कुठे किती घरे..
अत्यल्प उत्पन्न गट – 2790
लोकेशन – पहाडी गोरेगाव प्रधानमंत्री आवास योजना – 1947,
अॅन्टॉप हिल – 417
विक्रोळीच्या कन्नमवार नगर – 424
अल्प उत्पन्न गट – 1034 घरे
लोकेशन – गोरेगावमधील पहाडी परिसर.. – 736 घरांचा समावेश
उर्वरित घरे – लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर – गोरेगाव पश्चिम, डीएन नगर – अंधेरी, पंतनगर – घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी भागांत आहेत.
मध्यम उत्पन्न गट – 140 घरे
लोकेशन – उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, भायखळा, टिळकनगर चेंबूर, चांदिवली पवई, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबूर, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, चारकोप कांदिवली. लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबूर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षानगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत.
उच्च उत्पन्न गट 120 घरे..
लोकेशन – शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, सायन पूर्व येथे आहेत.
उत्पनाची अट..
अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणे आवश्यक आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) वार्षिक 9 लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे.
मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे.
उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) कमाल उत्पन्न मर्यादा नाही..