Take a fresh look at your lifestyle.

पशुपालकांनो, दूध डेअरीला न घालता घरच्या घरी तूप बनवून फक्त हे 2 औषधे मिसळा ; प्रति किलो मिळेल 1,000 रु. दर, पहा, Business Idea…

0

कोरोनानंतर लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता वाढली आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादनांची खरेदी देखील वाढली असून या गोष्टीचा फायदा घेत नवीन स्टार्टअप्सही सुरू झाले आहेत. तुम्ही सुद्धा या क्षेत्रात व्यवसाय करण्यास इच्छूक असला तर तुम्ही औषधी तूप बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. कोरोनाच्या काळात अश्या औषधी तुपाची मागणी खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारकडून कर्जही घेऊ शकता. या व्यवसायाबद्दल इथ्यंभूत माहिती खालीलप्रमाणे. . . 

तुपाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. औषधी तूप काळी मिरी, बडीशेप, पिपली इत्यादीपासून बनवले जाते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) औषधीयुक्त तूप बनवण्याच्या व्यवसायाचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल आणि त्यातून होणारा नफा याचा अंदाज लावला आहे.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने औषधीयुक्त तूप बनविण्याच्या व्यवसायावर तयार केलेल्या अहवालानुसार, व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 4.80 लाख रुपये खर्च येऊ शकतो. अहवालानुसार व्यवसायासाठी जमीन स्वतःच्या मालकीची असावी. 1000 चौरस फूट इमारतीचे शेड बांधण्यासाठी 200000 रुपये खर्च पकडला आहे.

दुसरीकडे, उपकरणे (व्हॉल्यूमेट्रिक घृता फिलिंग मशीन, बाटली धुणे इ.) ची किंमत रु. 1,80,000 असेल. एकूण भांडवली खर्च रु.3,80,000 होईल. 1,05,000 च्या खेळत्या भांडवलासह, एकूण प्रकल्पाची किंमत 4,85,000 रुपये होते.

KVIC च्या अहवालानुसार, वर्षाला 30,000 किलो औषधीयुक्त तूप तयार केले जाऊ शकते. त्याचा दर 800 रु किलो धरला तरी एकूण किंमत 2,40,00,000 पर्यंत जाते. तुम्हाला यामध्ये 30% नफा धरला तर वर्षभरात तुम्ही 70 लाखांचा नफा कमवाल.

KVIC ने सांगितले की हे सूचक आकडे आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी बदलू शकतात. इमारतीवर होणारी गुंतवणूक टाळून शेड जर भाडे तत्त्वावर घेतले तर प्रकल्पाचा खर्च कमी होऊन नफा वाढेल असेही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.