Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात 10 लाख विहिरी अन् 7 लाख शेततळी ! मागेल त्याला 4 लाखांचे अनुदान, या तारखेपर्यंत इथे करा अर्ज, पहा PDF फॉर्म..

0

दुष्काळाच्या अनुषंगाने ‘मनरेगा’चा अंतिम आराखडा तयार करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत आहे. रोजगार हमीतून दहा लाख विहिरी व सात लाख शेततळी आणि राज्यभरातील दहा लाख हेक्टरवर फळबाग, बांधावर वृक्षलागवड, रेशीम उद्योग आणि बांबू लागवड करण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश ‘रोहयो’ने दिले आहेत.

राज्यातील 40 तालुके आणि उर्वरित 178 तालुक्यांमधील एक हजार महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळाच्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्धी लेबर बजेट तयार करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.

दुष्काळी भागातील बाल – माता मृत्यू झालेल्या कुटुंबासह कुपोषित बालके असलेली कुटुंबे, निरक्षर कुटुंबे, शाळाबाह्य मुले असलेली कुटुंबे व भूमिहीन कुटुंबांना प्राधान्याने मनरेगातून रोजगार मिळणार आहे. राज्यात जॉबकार्ड असलेल्यांची संख्या 1 कोटी 30 लाख इतकी आहे.

दुष्काळग्रस्त भागातील लोकांना केंद्राच्या माध्यमातून 100 दिवस तर राज्य सरकारकडून 265 दिवस रोजगार मिळणार आहे. त्यातून 266 प्रकारची कामे केली जाणार आहेत त्यात विहिरी, शेततळे, नाला बंडिंग माती नालाबांध पांदण रस्ते, तलावातील गाळ काढणे, पाझर तलाव पूर्ण करणे, रोपवाटिका, वृक्षलागवड, शेत रस्ते अशा कामांचा समावेश आहे.

दरम्यान, कामे मुदतीत होण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची गरज भासणार असून त्यादृष्टीने ग्रामपंचायतींनी नियोजन करावे, असेही ‘रोहयो’ विभागाने स्पष्ट केले आहे.

अंतराची अटही रद्द, मागेल त्याला विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान..

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण व रोजगार हमी कायद्याअंतर्गत मागील त्या पात्र शेतकऱ्यांना मोफत सिंचन विहिरीकरता तब्बल 4 लाखांचे अनुदान मिळणार आहे. तालुक्यातील जॉब कार्ड धारक पात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सिंचन विहीर योजनेचा लाभ घेऊन आपले उत्पादन व उत्पादनात वाढ करून मी ‘समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध’ अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन रोहयो विभागाने केले आहे.

आता ही योजना शेतकरी लाभार्थींसाठी सुलभ करण्यात आली आहे, अट नाही त्यामुळे मागेल त्या पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहीर देण्यात येणार आहे आणि मर्यादा 3 वरून चार लाखापर्यंत करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत मिशन मोडवर सिंचन विहीर फळबाग व शेततळ्याचे कामे सुरू करण्याबाबत ग्राम रोजगार सेवकाची कार्यशाळाही घेण्यात येणार आहे.

तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर PDF फॉर्म.. 

अर्ज प्रोसेस पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

ॲण्ड्राइड मोबाइल नसलेल्यांनाच रोजगार..

‘रोहयो’ विभागाच्या निर्णयात ॲण्ड्राइड मोबाइल नसलेल्या भूधारकाना रोजगार द्यावा, असे नमूद आहे दुसरीकडे गॅस सिलिंडर भरू न शकणाऱ्या कुटुंबांनाही रोजगार द्यावा, असे म्हटले आहे. या अटीमुळे कोणाकडे मोबाइल आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी अधिकान्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच ॲण्ड्राइड मोबाइल असलेल्यांना रोजगार मिळणार नसल्याने अनेकाची चिंता वाढली आहे.

फेब्रुवारीत लोकसभेची आचारसंहिता ?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीमध्ये जाहीर होईल, ‘मनरेगा’ तून जून ते ऑक्टोबर या काळातच कामे होऊ शकतात. त्या दरम्यान राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर यंदा समृद्धी बजेट व जिल्हा कृती आराखडा तयार झाल्यानंतर कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता तातडीने द्याव्यात, अशाही सूचना राज्य सरकारने सर्वच विभागांना दिल्या आहेत. 2024-25 वर्षातील कामांना 15 फेब्रुवारीपूर्वी सर्व प्रकारच्या मान्यता द्याव्यात ‘असे रोहयो’ विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.