Take a fresh look at your lifestyle.

Air India विकल्यानंतर आता मोदी सरकार ‘या’ 3 कंपन्या विकणार ; 15,000 कोटींचं टार्गेट, प्रक्रियाही झाली सुरु, पहा डिटेल्स…

0

शेतीशिवार टीम : 19 सप्टेंबर 2022 :- Air India Subsidiary Company : एअर इंडियानंतर (Air India) सरकारने आता तिच्याशी संबंधित आणखी दोन कंपन्यांना विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) आणि एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) या एअर इंडियाच्या दोन स्वतंत्र कंपन्या आहेत.

कंपनीशी संबंधित एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) AIASL आणि AIESL मधील गुंतवणूकदारांचे हित जाणून घेण्यासाठी बैठका आणि रोड शो सुरू केले आहेत. आम्ही लवकरच इच्छुक बोलीदारांकडून ईओआय (EOI) आमंत्रित करणार आहोत…

Air India टाटा समूहाला 18,000 कोटी रुपयांना विकली….

सरकारने कर्जबाजारी एअर इंडिया (Air India) टाटा समूहाला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 18,000 कोटी रुपयांना विकली होती. अशाप्रकारे जानेवारीमध्ये एअर इंडिया पूर्णपणे टाटांच्या ताब्यात देण्यात आली. परंतु, एअर इंडियाच्या चार उपकंपन्या – एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL),एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL), अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेड (AAAL) आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (HCI) या कराराचा भाग नव्हत्या…

‘या’ उपकंपन्यांचे व्हॅल्युएशन किती आहे ते पहा…

The Economic Times च्या रिपोर्टनुसार, या उपकंपन्या आणि सुमारे 15,000 कोटी रुपयांची नॉन-कोर मालमत्ता SPV- एयर इंडिया एसेट्स होल्डिंग लिमिटेड (AIAHL) मध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे.

त्यानंतर सरकारने सांगितले की, या उपकंपन्या आणि नॉन-कोअर मालमत्ता नंतर विकल्या जातील. या क्रमाने, DIPAM ने AIASL आणि AIESL च्या खाजगीकरणासाठी गुंतवणूकदारांच्या बैठका आयोजित केल्या जाणार आहे.

एअर इंडियासाठी TATA चे प्लॅनिंग :- 

एकेकाळी एअर इंडियाचे भारतीय आकाशात वर्चस्व होतं. पण आज त्याचा बाजारातील हिस्सा 10 टक्क्यांहून कमी आहे. एअर इंडिया आता पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचा कायापालट करण्यासाठी एक व्यापक योजना आखली.

टाटा समूहाने याला विहान.ए.आई (Vihaan.AI) असं नाव दिलं आहे. याअंतर्गत येत्या पाच वर्षांत 30% बाजारपेठेतील वाटा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या योजनेत पाच गोष्टींवर भर देण्यात आला आहे. यामध्ये वर्धित ग्राहक अनुभव, मजबूत ऑपरेशन्स, उद्योग-उत्तम प्रतिभा, उद्योग नेतृत्व आणि व्यावसायिक कार्यक्षमता यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.