शेतीशिवार टीम : 22 ऑगस्ट 2022 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC द्वारे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरळीत पार पडली. या परीक्षेत राज्यसेवा पूर्व परीक्षा सेट – B मधील प्रश्नसंचातील पहिले 20 प्रश्न आणि त्यांचे उत्तरे जाणून घेणार आहोत…
प्रश्न 1 : खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात ?
पर्याय :-
(1) पॅरलॅक्स पद्धती
( 2 ) डायरेक्ट डिस्टन्स मापन
( 3 ) स्लोप टॅपींग पद्धती
( 4 ) इको पद्धती
उत्तर :- (1) पॅरलॅक्स पद्धती
प्रश्न 2 : ओहम रोघ असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 33 V विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते . 500 ओहम रोघ असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल ?
पर्याय :-
(1) 726V
(2) 455V
(3) 1500V
(4) 150V
उत्तर :- (4)150V
प्रश्न 3 : खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नांव कोणते आहे ?
पर्याय :-
(1) तांबे (कॉपर)
(2) जस्त (झिंक)
(3) सिलीकॉन
(4) लोडस्टोन (Fe304)
उत्तर :- (4) लोडस्टोन (Fe304)
प्रश्न 4 : सोनार साउंड नेव्हीगेशनल श्रेणी तंत्र यासाठी वापरले जाते ? .
पर्याय :-
(1) जन्मपूर्व परीक्षा
(2) हृदयाच्या झडपांच्या क्रियेचा अभ्यास
(3) भुवैज्ञानिक अभ्यास
(4) पानबुडीसारख्या बुडलेल्या वस्तुची गती आणि स्थिती मापण्यासाठी
उत्तर :- (4) पानबुडीसारख्या बुडलेल्या वस्तुची गती आणि स्थिती मापण्यासाठी…
प्रश्न 5 : एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्स असून तरंगलांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल, तर कापलेले अंतर काढा.
पर्याय :-
(1) 50km
(2) 800m
(3) 1250m
(4) 80km
उत्तर :- (3) 1250m
प्रश्न 6 : दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे, जर दोन समतल आरशामधील कोन 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील?
पर्याय :-
(1) 0
(2) 1
(3) 11
(4) 12
उत्तर :- (3)11
प्रश्न 7 : खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पती मध्ये वृद्धत्व निर्माण करते ?
पर्याय :-
(1) ऑक्झिन
(2) इथिलीन
(3) सायटोकायनिन
(4) ॲबसेसिक ॲसिड
उत्तर :- ॲबसेसिक ॲसिड
प्रश्न 8 : डोळ्यांचा रंग पांढरा असणाच्या ड्रॉसोफिला च्या मादीचा, डोळ्यांचा रंग लाल असणान्या ड्रॉसोफिलाच्या नरा बरोबर संकरण झाले, तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल ?
पर्याय :-
(1) पांढरा
(2) लाल
(3) लाल आणि पांढरा यांचे मिश्रण
(4) लाल आणि निळा यांचे मिश्रण
उत्तर :- पांढरा
प्रश्न 9 : 5 व्हायरॉईड्स खालीलपैकी कोणत्या तीन विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात ?
पर्याय :-
(a) विषाणुपेक्षा आकाराने बरेच लहान असणे.
(b) गोलाकार रायबोन्युक्लीक ॲसीड (RNA) रेणु ने बनलेले
(c) RNA रेणु प्रथीन (प्रोटीन) आवरणाने आच्छादित असणे.
(d) पादप पेशी (वनस्पतीपेशी) संक्रमित करणे
पर्यायी उत्तरे :-
(1) (a), (b), (d)
(2) (a), (b), (c)
(3) (a), (c),(d)
(4) (b), (c), (d)
उत्तर :- (a), (b), (d)
प्रश्न 10 : खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत?
पर्याय :-
(a) दगड गोटे व वाळू
(b) बारीक माती व कुजलेले पदार्थ
(c) रासायनिक पदार्थ
(d) रंगद्रव्ये
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (c) आणि (d)
(2) फक्त (a) आणि (b)
(3) (a), (b), (c) आणि (d)
(4) (a), (b), (c) आणि (d) पैकी नाहीं
उत्तर :- (2) फक्त (a) आणि (b)
प्रश्न 11 :- प्राणीवर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते ?
पर्याय :-
(1) प्रजाती → जात →ऑर्डर→ वर्ग →कुळ→ संघ→ सृष्टी
(2) सृष्टी →जात → ऑर्डर →प्रजाती →संघ→ वर्ग→ कुळ
(3) जात → प्रजाती→ संघ →वर्ग →ऑर्डर →कुळ→ सृष्टी
(4) सृष्टी→ संघ→ वर्ग→ ऑर्डर→ कुळ →जात → प्रजाती
उत्तर :- (4) सृष्टी→ संघ→ वर्ग→ ऑर्डर→ कुळ →जात → प्रजाती
प्रश्न 12 :- परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. जेथे अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात :
पर्याय :-
(a) उत्पादकता
(b) कुजणे
(c) पोषण चक्र
(d) उर्जा प्रवाह
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत?
पर्यायी उत्तरे :-
(1) फक्त (a)
(2) (a), (b)
(3) (a), (b), (c) आणि (d)
(4) फक्त (a) (b) आणि (d)
उत्तर :- (3) (a), (b), (c) आणि (d)
प्रश्न 13 : खालीलपैकी राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या ?
पर्याय :-
(1) जयंती पटनायक
( 2 ) डॉ. पूर्णिमा अडवाणी
( 3 ) डॉ. व्ही. मोहिनी गिरी
( 4 ) विभा पार्थसारथी
उत्तर :- जयंती पटनायक
प्रश्न 14 : भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार, विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल, तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिलेला आहे ?
पर्याय :-
( 1 ) अनुच्छेद 168
( 2 ) अनुच्छेद 167
( 3 ) अनुच्छेद 166
( 4 ) अनुच्छेद 169
उत्तर :- (4) अनुच्छेद 169
प्रश्न 15 : भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात ?
पर्याय :-
(1) अनुच्छेद 142
(2) अनुच्छेद 145
(3) अनुच्छेद 147
(4) अनुच्छेद 143
उत्तर :- (4) अनुच्छेद 143
प्रश्न 16 : राष्ट्रीय अनुसूचित जाती ( एस.सी. ) आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला आहे ?
पर्याय :-
(1) कलम 337
(2) कलम 338
(3) कलम 336
(4) कलम 335
उत्तर :- (2) कलम 338
प्रश्न 17 : 13 डिसेंबर, 1946 रोजी यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दीष्टांचा ठराव कोणी मांडला.
पर्याय :-
(1) सुचेता कृपालानी
(2) सरोजिनी नायडू
(3) डॉ. राजेंद्र प्रसाद
(4) पंडीत जवाहरलाल नेहरू
उत्तर :- (4) पंडीत जवाहरलाल नेहरू
प्रश्न 18 : JNU चे भूतपूर्व कुलगुरु ममिदाला जगदिश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
पर्याय :-
(1) एन.सी.ई.आर.टी.
(2) यु.जी.सी.
(3) यु.पी.एस.सी.
(4) आय. एस. आर.ओ.
उत्तर : (2) यु.जी.सी.
प्रश्न 19 : टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’ -2021 साठी खालीलपैकी कोणाची निवड केली?
पर्याय :-
(1) मलाला युसूफजाई
(2) रतन टाटा
(3) इलॉन मस्क
(4) कमला हॅरिस
उत्तर : (3) इलॉन मस्क
प्रश्न 20 : जानेवारी 2022 मध्ये आर. नागास्वामी यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते ?
पर्याय :-
(1) पर्यावरण
(2) पुरातत्त्वशास्त्र
(3) चित्रकारिता
(4) अभिनय
उत्तर : (2) पुरातत्त्वशास्त्र
प्रश्न 21 : कोणत्या देशाने हॉसाँग -12 मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले ?
पर्याय :-
(1) चीन
(2) जपान
(3) उत्तर कोरिया
(4) दक्षिण कोरिया
उत्तर :- (3) उत्तर कोरिया
प्रश्न 22 : कोणत्या रेसिंग ड्रायव्हर ने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली ?
पर्याय :-
(1) चार्लस् लेक्लेर्क
(2) मैक्स वर्स्टपेन
(3) वॅलटेरी बॉटास
(4) लुईस हॅमिल्टन
उत्तर :– (2) मैक्स वर्स्टपेन
प्रश्न 23 : कोणत्या राज्याने बॉलीवुड अभिनेता संजय दत्त ला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून करारबद्ध केले आहे?
पर्याय :-
(1) सिक्किम
(2) मणीपूर
(3) आसाम
(4) अरुणाचल प्रदेश
उत्तर :- (4) अरुणाचल प्रदेश
प्रश्न 24 : पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली आहेत ?
पर्याय :–
(1) आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (ILO)
(2) अन्न आणि शेती संघटना (FAO)
( 3 ) जागतिक आरोग्य संघटना (WHO)
( 4 ) आंतरराष्ट्रीय टपाल संघटना (UPU)
उत्तर :- (1) आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (ILO)
प्रश्न 25 : ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कोणती ?
पर्याय :-
(1) देना बँक(Dena Bank)
(2) एस.बी.आय.(SBI Bank)
(3) बी.ओ.बी.(BOB)
(4) पी.एन.बी.(PNB)
उत्तर :- (2) एस.बी.आय.(SBI Bank)