शेतीशिवार टीम : 22 ऑगस्ट 2022 :- गेल्या काही काळापासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे, विशेषत: टू – व्हीलर वाहनांच्या सेगमेंटमध्ये लोकांनी खूप रस दाखवला आहे. देशातील टॉप ची इलेक्ट्रिक व्हायकल प्रॉडक्शन कंपनी ओलाने (OLA) दावा केला आहे की, जेव्हापासून कंपनीने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली तेव्हापासून आतापर्यंत 70 हजारांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

15 ऑगस्ट रोजी, कंपनीने एका कार्यक्रमादरम्यान नवी स्वस्तातली S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली, ज्याची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु, सुरुवातीला जेव्हा कंपनीने आपली S1 Pro स्कूटर डिसेंबर 2021 मध्ये लॉन्च केली तेव्हा त्याची किंमत 1.30 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. सध्या ओला (OLA) स्कूटर S1 आणि S1 Pro या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

15 ऑगस्ट रोजी, ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ‘मिशन इलेक्ट्रिक 2022’ व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये घोषणा केली की, या स्कूटरच्या 70 हजारांहून अधिक युनिट्स आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत. याशिवाय, कंपनीने भविष्यात येणार्‍या आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारचा लुक आणि डिझाइन वरूनही पडदा हटवला आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही देशातील सर्वात फास्ट आणि स्पोर्टी इलेक्ट्रिक कार असेल, जी एका चार्जवर 500Km पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देईल. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर देखील पुन्हा लाँच करण्यात आली आहे आणि ती S1 Pro बेस्ड आहे, परंतु किंमत कमी आहे. जरी दोन्ही जवळपास सारख्याच दिसत असल्या तरी त्यांच्यात काही लक्षणीय फरक देखील आहेत.

Ola S1 आणि Pro मध्ये नेमका काय आहे फरक :-

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर 4kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे आणि प्रति चार्ज 181Km ARAI – प्रमाणित राइडिंग रेंजसह येते. याशिवाय, यात फोर राइडिंग मोड आहेत, ज्यात इको, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर मोड देण्यात आलं आहे. इलेक्ट्रिक स्कूटर हायपरड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते जी 8.5kW (11.3 bhp) पॉवर आउटपुट आणि 58 Nm टॉर्क जनरेट करते.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एका चार्जमध्ये 131Km (ARAI प्रमाणित) ची रेंज देते. याशिवाय स्कूटरमध्ये अनेक वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत, त्यानुसार त्याची रेंजही बदलेल.

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या मते, ही स्कूटर इको मोडमध्ये 128Km, नॉर्मल मोडमध्ये 101Km आणि स्पोर्ट मोडमध्ये 90Km ची ड्रायव्हिंग रेंज देते. तसेच, त्याचा टॉप स्पीड ताशी 95Km आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh बॅटरी पॅक समाविष्ट आहे आणि याला S1 Pro मॉडेल प्रमाणेच Move OS देखील मिळतो.

नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लूकवाईज S1 Pro सारखीच दिसणारी बॉडी आहे, त्यात सीमलेस कर्व्ह्स आहेत. याशिवाय, जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट या चार कलरमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने स्कूटरच्या नवीन मॉडेलसाठी 499 रुपये किमतीत बुकिंग सुरू केलं आहे. ग्राहकांना 2 सप्टेंबरपासून या स्कूटर खरेदी करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *