महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वी निकालाची तारीख जाहीर केली आहे. आज सोमवारी, बोर्डाने एक नोटीस जारी केली असून 12वीचा निकाल मंगळवार, 21 मे 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट http://www.mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे.
उद्या किती वाजता जाहीर होणार निकाल ?
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत सूचनेनुसार, इयत्ता 12वीचा निकाल 21 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. पत्रकार परिषदेद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी, टॉपर्सची नावे, प्रवाहनिहाय निकाल आदी माहिती पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे. यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 15.13 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती..
यावर्षी कधी झाली परीक्षा ?
यंदा महाराष्ट्रात 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान झाली होती. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण 15.13 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7 लाख 60 हजार 46, कला शाखेसाठी 3 लाख 81 हजार 982, वाणिज्य शाखेसाठी 3 लाख 29 हजार 905 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37 हजार 226, आयटीआयसाठी 4 हजार 750 विद्यार्थ्यांचा समावेश आहे..
आपण या स्टेप्सद्वारे पाहू शकता निकाल ?
महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल 2024 पाहण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्यावी लागेल.
वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला निकालाच्या ऍक्टिव्ह लिंकवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल आणि निकाल पहा बटणावर क्लिक करावे लागेल.
यानंतर, तुमचा निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही तो तपासू शकाल तसेच गुणपत्रिकेची प्रत डाउनलोड करू शकाल..