पेरू लागवडीतून ‘या’ जिल्ह्यातील शेतकरी मालामाल, फक्त 2 एकरातून पहिल्याच वर्षी कमावला 29 लाखांचा नफा ; ‘या’ पेरूच्या जातीची सगळीकडं चर्चा
बदलते हवामान, वाढती मजूरी, नेहमी पडणारे पिकांचे बाजार भाव यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे जिकीरीचे झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांची मुले शेती करण्यास धजावत नाहीत. हे चित्र नेहमी पहावयास मिळत आहे. या सर्वांवर मात करणारे चित्र वाशिंबे (ता.करमाळा) परिसरात पाहण्यास मिळत आहे.
येथील सतिष झोळ व लक्ष्मण झोळ या बंधूंनी जिद्द, चिकाटी, पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत शेतीमध्ये मेहनतीच्या जोरावर 3 एकर तैवान पिंक पेरु लागवडीतून पहिल्याच वर्षी 29 लाख रुपयांचे उत्पादन घेतलं आहे.
वाशिंबे गाव हे उजनी लाभक्षेत्रात असल्याने या परिसरात ऊस हे मुख्य पीक घेतले जाते. परंतु, वारंवार ऊसाचे एकच पिक घेतल्याने उत्पन्नात होणारी घट, पिकासाठी लागणारा जास्तीचा कालावधी, खतांचा वाढलेला खर्च, गाळपासाठी होणारा त्रास त्यामुळे झोळ बंधुंनी पारंपरिक पिकाला फाटा देत पेरु लागवडीचा निर्णय घेतला.
तैवान पिंक या जातीच्या 2600 रोपांची तीन एकर क्षेत्रावर दोन ओळीत 10 फूट व दोन रोपात पाच फूट अंतर ठेवून लागवड केली. लागवडीपासून विक्रीपर्यंत सहा लाख रुपये खर्च आला. शेताच्या बांधावरच 50 ते 72 रुपये प्रतिकिलो दराने मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांना मालाची विक्री केली. 49 टन मालाच्या विक्रीतून 29 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.
रोगापासून पेरूचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर व प्लास्टिक बॅगचा वापर केला. यामुळे गुणवत्ता व दर्जा चांगला राखण्यात यश मिळाले आहे. झोळ बंधुंनी योग्य व्यवस्थापन व कमी कालावधीत घेतलेले भरघोस उत्पन्न त्यामुळे त्यांची शेती परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे.
अभ्यास करुन पेरु लागवडीचा निर्णय कृषी मेळाव्याला उपस्थित राहून व यशस्वी पेरु बागायतदारांच्या प्लॉटला भेट देऊन त्यातील बारकावे जानून परु लागवडाचा निर्णय घेतला. बाजारपेठेचा अंदाज घेत फळ छाटणी करुन बहर घेत पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न निघाले . – सतिष झोळ, शेतकरी, वाशिंबे
*** तैवान पिंक पेरूच्या (Taiwan Pink Guava) रोपांची खरेदी करण्यासाठी तुम्ही या https://www.indiamart.com/proddetail/taiwan-pink-guava-plants-20436155691.html लिंकवरून करू शकता…