राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण ‘शेतीशिवार’च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळ्यासाठी अनुदान देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना’ या योजनेला 2021 मध्ये पूर्ण राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन अनुदानास पूरक म्हणून अनुदान दिलं जातं.

त्यामध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन साठी 80% अनुदान दिले जातं. तर 2020 मध्ये नवीन मंजुरी देऊन वैयक्तिक शेततळे योजनेसाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी घेण्यात आलेली होती. अशा प्रकारच्या बाबींसह राबवली जाणारी ही महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत 2019 पासून शेतकऱ्यांना पूरक अनुदान द्यायला सुरुवात झाली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान दिलं जातं तर बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान दिलं जातं. आणि या योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून वरील 30% आणि 25% अनुदान हे या योजनेअंतर्गत दिलं जातं.

2019-2020 चं बजेट निघालं परंतु 2020-2021-2022- याचबरोबर 2022- 2023 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचन अनुदानाचा लाभ घेतलेला आहे.

परंतु पूरक अनुदान अद्यापही वितरित करण्यात आलेलं नाही. यामध्ये 2020 -21 मध्ये फक्त 199 कोटी रुपये वितरित झाले होते आणि 2021-22 मधील पूर्ण लाभार्थी अजूनही वंचित आहे.

याच पार्श्वभूमीवर या योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यापैकी 60% निधीच्या प्रमाणात प्रमाणामध्ये 360 कोटी रुपयांचा निधीसह ही योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे. आणि यापैकी 165 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर काय आहे शासन निर्णय ? कशाप्रकारे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ? हे आपण जाणून घेउया…

शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लीक करा

हेक्टरी किती मिळेल अनुदान ते पहा :-

*** तुषार सिंचन क्षेत्र****

1) बाब :- ठिबक सिंचन (1 हेक्टर साठी) लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6

खर्च मर्यादा :- 127501 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 1,2001 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 95,626 रुपये

2) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 1.5X1.5

खर्च मर्यादा :- 97,245 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 77,796 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 72,934 रुपये

3) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 5X5

खर्च मर्यादा :- 39,378 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 31,502 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 29,533 रुपये

*** तुषार सिंचन क्षेत्र****

1) बाब : तुषार सिंचन (1 हेक्टर साठी)

खर्च मर्यादा (75mm) :- 24,194 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 19,355
अनुदान :- 75 % नुसार – 18,145

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्ज कसा कराल ?

या योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने एक ऑफिशियल पोर्टल तयार केलं आहे.

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये अर्ज करा यावर क्लिक करा.

3) 3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण नंतर दुसऱ्या नंबरला ‘सिंचन साधने व सुविधा’ हा ऑप्शन दिसेल. त्याच्यासमोरच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक घटक (सूक्ष्म सिंचन घटक) समोरील बाबी निवड वर क्लिक करा.

4) यानंतर तुम्हाला सिंचन ‘सिंचन स्रोत’ हा ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचं शेतावरील ‘सिंचन स्रोत’ / ‘ऊर्जा स्रोत’ / तसेच तुमच्याकडे कोणतं सिंचन उपकरण आहे, त्यावर सिलेक्ट करा.यानंतर खाली ‘जोडा’ या शब्दावर क्लिक करा. तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या जतन होईल..

5) आता तुम्हाला तुमचं स्रोत ऍड झालेलं दिसेल. आता तुम्ही मुख्यपृष्ठ वर या. आणि पुन्हा ‘अर्ज करा’ या ऑप्शनवर क्लिक करा. आणि पुन्हा ‘सिंचन साधने व सुविधा’ वरील बाबी निवडा वर क्लिक करा.

6) आता तुमच्यासमोर मेन अर्ज खुलेल जसे की, गाव / तालुका / गट क्रमांक / मुख्य घटक / घटक निवडा / परिणाम / काल्पर व्यास या सर्व बाबी काळजीपूर्वक भरा.

7) यानंतर खाली तुमचं क्षेत्र हंगाम / (हेक्टर आणि आर) / पीके / ही माहिती भरा.

8) यानंतर तुमचा अर्ज ‘Succes ‘ होईल.

10) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

11) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

शेततळ्यासाठी 75 हजारापर्यंत अनुदान अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *