मुंबई – पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग सिग्नलमुक्त करण्यात येणार आहे. एमएमआरडीएने (MMRDA) या दिशेने पावले उचलली आहेत. मुंबई – पुणे दरम्यान सिग्नलमुक्त मार्ग तयार झाल्याने इंधनाची मोठी बचत होणार असून वाहनचालकांच्या वेळेचीही बचत होणार आहे.

सरकारने 1092 कोटी रुपये खर्चून सुमारे 4.5 कि.मी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कॉरिडॉर शिवडी – न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) आणि मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेला जोडला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील चिर्ले इंटरचेंज ते मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे दरम्यान हा एलिव्हेटेड रस्ता (MTHL) बांधण्यात येणार आहे.

प्रकल्प 30 महिन्यांत होणार पूर्ण..

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) येत्या तीन महिन्यांत हा प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे. राज्यातील दोन सर्वोत्तम रस्त्यांना जोडणारा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण होणार आहे. सुमारे 4.5 किमी लांबीच्या कनेक्टरच्या बांधकामासाठी सुमारे 1092 कोटी रुपये खर्च केले जाणार असून प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदाराची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जूनअखेर कंत्राटदाराची निवड केली जाईल. MMRDA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला निविदा प्राप्त झाल्यापासून 30 महिन्यांच्या आत काम पूर्ण करावे लागणार आहे. यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांचाही समावेश होतो.

प्रवास होणार सुस्साट..

मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी समुद्रावर 22 कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येत आहे. या मार्गावर सिग्नल असणार नाही. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर 15 ते 20 मिनिटांत कापता येते. पुलाचे काम जवळपास 94 टक्के पूर्ण झाले आहे. 2023 च्या अखेरीस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

चिर्ले येथील वाहतूक कोंडीची समस्याही सुटणार..

चिर्ले येथे हा पूल पूर्णत्वास येत असल्याने वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. या समस्येवर मात करण्यासाठी MMRDA ने MTHL ला थेट मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेशी कनेक्टरद्वारे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून मुंबईला जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. MTHL आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामामुळे हा प्रवास 20 ते 25 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.

गोवा महामार्गालाही जोडला जाणार..

मुंबई – पुणे दरम्यान सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा मार्ग सुकर करण्यासाठी एमएमआरडीएने योजना तयार केली आहे. याअंतर्गत MTHL लाही थेट मुंबई – गोवा महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

पहा या प्रकल्पाची ब्लू प्रिंट..

4.5 किमी. लांब असणार एलिव्हेटेड कॉरिडॉर..

30 महिन्यांत होणार तयार

1092 कोटी रुपये खर्च होणार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *