Take a fresh look at your lifestyle.

Mumbai – Shirdi – Solapur Vande Bharat Train : दोन्ही रूटवर ट्रेन सुरु, जाणून घ्या स्टेशन्स, तिकीट दर अन् टाइम टेबल..

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पहिला मुंबई आणि सोलापूर दरम्यान आणि दुसरा मुंबई आणि शिर्डी दरम्यान. मुंबईत उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी पीएम मोदी म्हणाले, “पहिल्यांदा 2 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या. ते मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना जोडण्यात आल्या असून याचा फायदा कॉलेज आणि ऑफिसला जाणारे लोक, शेतकरी आणि भाविकांना होणार आहे. महाराष्ट्राला रेल्वेसाठी 13,500 कोटी रुपये मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे.

वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावणार आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई – शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर दररोज हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. मुंबई – सोलापूर वंदे भारत ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होणारी नववी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे.

वंदे भारत CSMT ते शिर्डी हा प्रवास 6 तासांत पूर्ण करणार असून 5 तास 20 मिनिटात पार करणार असून दादर, ठाणे आणि नाशिकरोडवर थांबे देण्यात येणार आहेत. मुंबई ते नाशिकरोडपर्यंत ही अंतर ही ट्रेन फक्त 2 तास 37 मिनिटांत पार करणार आहे.

भविष्यात आणखी स्टेशवनर ही ट्रेन थांबणार असून तसेच CSMT ते सोलापूर दरम्यानचा वंदे भारत हा प्रवास साडेसहा तासांत पूर्ण करणार आहे. ही ट्रेन दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुर्डुवाडी या स्टेशन्सवर थांबणार आहे.160 किमी प्रतितास क्षमतेच्या वंदे भारतचा मुंबई – शिर्डी दरम्यान सरासरी वेग 60 किमी प्रतितास असून मुंबई ते सोलापूर दरम्यान ही ट्रेन सरासरी 70 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे.

मुंबईहून सकाळी 6.15 वाजता निघणार वंदे भारत ट्रेन

CSMT : 6.15 am (प्रस्थान)

साई नगर शिर्डी : 12.10 pm (आगमन)
साई नगर शिर्डी : सायंकाळी 5.25 (प्रस्थान)
CSMT : 11.18 pm (आगमन)

सोलापूर : 6.05 am (प्रस्थान)
पुणे : 9 am (आगमन)
CSMT : 12.35 pm (आगमन)
CSMT : 4.10 pm (प्रस्थान)
पुणे : 7.10 pm (आगमन)
सोलापूर : रात्री 10.10 pm (आगमन)

मुंबई ते शिर्डी वंदे भारत ट्रेनला किती असणार तिकीट..

ही वंदे भारत ट्रेन मुंबई सीएसटी स्टेशन ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणार असून हे अंतर पाच तास 20 मिनिटांत पूर्ण करणार आहे. ही गाडी सकाळी 6.20 वाजता सुटणार असून 11.40 वाजता शिर्डीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिक – रोड स्थानकावर थांबणार असून वंदे भारत ट्रेन मंगळवार वगळता सहा दिवस धावणार आहे. केटरिंग सेवेशिवाय चेअर कार तिकिटची किंमत 840 रुपये आहे आणि जेवणासह 975 रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी तिकिटाची केटरिंग शिवाय ₹1,670 आणि जेवणासह ₹1,840 आहे.

मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला किती असणार तिकीट..

मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस बुधवार वगळता सहा दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT) येथून सायंकाळी 4:05 वाजता सुटेल आणि सोलापूरला रात्री 10:40 वाजता पोहचणार आहे. ही गाडी दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे 6 तास 35 मिनिटांच्या प्रवासात थांबणार आहे. केटरिंग सेवेशिवाय चेअर कार तिकिटांची किंमत ₹1,000 आणि कॅटरिंग सेवेसह ₹1,300 आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कार तिकिटाची किंमत केटरिंग सेवेशिवाय 2,015 आणि केटरिंग सेवेसाठी 2,365 आहे.

रूटवर कोणत्या तीर्थक्षेत्रांचं घेता येणार दर्शन ?

मुंबई – सोलापूर ट्रेन यात्रेकरूंना सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि अगदी आळंदी येथील प्रसिद्ध मंदिरे आणि देवस्थानांपर्यंत पोहचता येणार आहे. ही ट्रेन, मुंबई – साईनगर शिर्डी ट्रेन प्रमाणेच, त्र्यंबकेश्वर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, शनि शिंगणापूर आणि नाशिक, यामध्ये नाशिक जेथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्याशिवाय या भागातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी भक्तांना घेता येणार असून पुढील कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे.

महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी म्हणून सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो, तर नाशिकला तीर्थक्षेत्राची राजधानी म्हणून ओळखले जाते, या दोन्ही ठिकाणी पर्यटकांव्यतिरिक्त देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक येतात.

Leave A Reply

Your email address will not be published.