130Km चा वेग, मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 6 तासांत..! वंदे साधारण ट्रेनची पहिली ट्रायल रन यशस्वी, पहा डिटेल्स.
रेल्वे प्रवाशांना लवकरच वंदे साधारण ट्रेनचे गिफ्ट मिळणार आहे. या ट्रेनची सेवा प्रवाशांना लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने वंदे साधारण ट्रेनची ट्रायल रन सुरू केली आहे. मंगळवारी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान या ट्रेनची टेक्निकल ट्रायल घेण्यात आली.
अहमदाबादहून मुंबई सेंट्रलला पोहोचण्यासाठी ट्रेनला सुमारे 6 तास 30 मिनिटे लागली. बुधवारी ट्रेनची स्पीड ट्रायलही झाली आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान ताशी 130 किमी वेगाने धावली. ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथून सकाळी 6.40 वाजता सुरत अहमदाबादला पोहोचेल. .
वंदे साधारण ट्रेनला एकूण 22 डबे असतील. 22 पैकी 12 डबे स्लीपर, 8 डबे सेकंड क्लासचे आणि 2 डबे सामानाचे असतील. ट्रेन पुश – पुल टेक्नॉलॉजीवर चालवली जाईल, जेणेकरून ती अधिक वेगाने धावू शकेल. पुश – पुल अंतर्गत, समोरचे इंजिन वाहनला खेचते, तर मागे असलेलं इंजिनला धक्का देतं.
या ट्रेनची दोन्ही इंजिने WAP-5 सिरीजमधील आहे. भारतीय रेल्वेच्या मध्यम अंतराच्या जलद गाड्यांमध्ये ही इंजिने बसवली जातात. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 130 किमी, तर वंदे भारत एक्स्प्रेस ताशी 160 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे.
जुलैमध्ये करण्यात आली होती घोषणा..
जुलैमध्ये भारतीय रेल्वेने सामान्य गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ही घोषणा केली होती. या गाड्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सारख्या बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या नॉन – एसी गाड्या असतील आणि त्यांचे भाडेही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’पेक्षा कमी असेल. या गाड्यांना आता ‘वंदे साधरण’ ट्रेन म्हटलं जात आहे.
वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपरचीही तयारी सुरू..
वंदे भारत आणि वंदे मेट्रोच्या स्लीपर व्हर्जनवरही रेल्वे वेगाने काम करत आहे. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारतच्या स्लीपर व्हर्जन ट्रेनचा कॉन्सेप्ट फोटो शेअर केला आहे. ते पुढील वर्षी मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, त्यापैकी 11 एसी 3 टायर, 4 एसी 2 टायर आणि 1 डबा फर्स्ट एसी असेल. या ट्रेनचा सेट पुढील वर्षी मार्चपूर्वी तयार होईल, त्यानंतर पहिली ट्रेन ट्रायलसाठी पाठवली जाईल. त्याचवेळी फेब्रुवारी -मार्चपर्यंत येणार्या वंदे मेट्रोबाबतही तयारी जोरात सुरू आहे.