अलिकडच्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे, सध्या रोड कनेक्टिव्हीटी च्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रगती होत असताना, अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि हाय-स्पीड कॉरिडॉर बांधण्यासाठीच्या योजना सुरू आहेत, ज्यामुळे देशातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल.
लवकरच मुंबई आणि कोलकाता यांच्यादरम्यान एक प्रवेश – नियंत्रित एक्सप्रेसवे होण्याची शक्यता आहे. काही न्यूज एजन्सीच्या निष्कर्षांनुसार, 2028 पर्यंत ही दोन्ही शहरे एक्स्प्रेसवेच्या माध्यमातून जोडली जाण्याची शक्यता आहे, असे झाले तर या दोनही महत्वाच्या शहरांमधे लागणार प्रवासाचा वेळ अत्यंत कमी होणार आहे. मुंबई आणि कोलकाता या दोन शहरांच्या मार्गावरील विविध शहरांना जोडण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक आगामी एक्सप्रेसवेद्वारे ही कनेक्टिव्हिटी घडवून आणली जाणार आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग, नागपूर – भंडारा – गोंदिया द्रुतगती मार्ग, रायपूर-धनबाद इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि वाराणसी-कोलकाता द्रुतगती मार्ग हे मार्ग या कनेक्टिव्हिटीला हातभार लावणारे प्रमुख एक्सप्रेसवे असणार आहेत.
असे असले तरी भंडारा आणि रायपूर दरम्यान कोणताही द्रुतगती मार्ग असणार नाही. त्यामुळे या एक्सप्रेसवेच्या कनेक्टिव्हिटीमध्ये अंतर राहील. मात्र, उर्वरित भागामध्ये अखंड प्रवेश-नियंत्रित एक्सप्रेसवे असतील.
नागपूर ते विजयवाडा एक्सप्रेस वे
पहा रोड मॅप
नागपूर – भंडारा – गोंदिया द्रुतगती मार्ग :-
मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गाचा विस्तार करून 127 किलोमीटर लांबी असलेला, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना जोडणारा इस्टर्न एक्सप्रेसवे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या द्रुतगती मार्गाला मंजुरी मिळाल्यास नागपूर ते गोंदिया दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 4 ते 5 तासांवरून लक्षणीयरीत्या दोन तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
याचप्रमाणे रायपूर-धनबाद इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि वाराणसी-कोलकाता द्रुतगती मार्ग हे देखील प्रस्तावित मार्ग आहे या सर्व प्रकल्पांना मंजूरी मिळाल्यास लवकरच मुंबई ते कोलकाता हा प्रवास देखील द्रुतगती मार्गावरून करता येईल.