Mumbai Metro : अंडरग्राउंड मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरु, आरे ते BKC दरम्यान हे आहेत 10 स्टेशन्स, पहा Route Map..
मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रोच्या डब्यांच्या मेन्टेनन्ससाठी आरेमध्ये कारशेड बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने कारशेडचे 95% काम पूर्ण केले आहे. अशा स्थितीत मेट्रो – 3 मार्गावरील पहिल्या टप्प्यातील सेवा एप्रिलपर्यंत सुरू होण्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
MMRC ने गेल्या वर्षी डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु ट्रायल रन आणि कारशेड तयार नसल्यामुळे ही डेडलाइन पुढे ढकलली गेली आणि आता एप्रिल 2024 ही नवीन डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे..
MMRC च्या एमडी अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरेतील कारशेडच्या बांधकामाचा आढावा घेतला. एमएमआरसीच्या मते, आरेमधील स्टेशन बिल्डिंग, शंटिंग ट्रॅक, ओसीसी बिल्डिंग आणि मेंटेनन्स वर्कशॉपचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 9 ट्रेनची सेवा सुरू करण्याची योजना आहे, 8 डब्यांच्या 9 ट्रेन आधीच आरेला पोहोचल्या आहेत. आगारातील गाड्या असेंबल करण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे.
आरे ते BKC दरम्यान मेट्रो धावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ट्रायल रन सुरू आहे. मात्र, अद्याप टेस्टिंग प्रोसेस पूर्ण झालेली नाही. आरेमध्ये 25 हेक्टर जागेवर एक कारशेड बांधली जात आहे, जिथे 42 मेट्रो ट्रेन सहज ठेवता येतील. कुलाबा – वांद्रे – आरे दरम्यान 35 किलोमीटर लांबीचा मेट्रो कॉरिडॉर बांधण्यात येत आहे. आतापर्यंत, संपूर्ण कॉरिडॉरच्या 85 टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे.
पहिला टप्पा : 12.22 किमी
पहिल्या टप्प्यातील स्थानके..
आरे
झिप्स
MIDC
मरोळ नाका
इंटरनॅशनल एयरपोर्ट
सहार रोड
डोमेस्टिक एयरपोर्ट
सांताक्रूझ
विद्यानगरी
बीकेसी
दुसरा टप्पा : 21.39 किमी
एकूण मार्ग : 35 किमी
मेट्रो पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रिलमध्ये आरे ते बीकेसी दरम्यान धावणार आहे..
2024 च्या अखेरीस दुसरा टप्पा होणार सुरु..
मेट्रोचा पहिला टप्पा आरे कॉलनी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ला जोडेल आणि या मार्गावर 10 स्टेशन्स असतील. त्यापैकी 9 अंडरग्राउंड स्टेशन्स आहेत. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) द्वारे राबविण्यात येत आहे. मेट्रो लाइन 3 चे UGC-07 पॅकेज L&T आणि STEC च्या संयुक्त उपक्रमासोबत आहे, जे स्टेशनचे सिव्हिल वर्क, सिस्टम इन्स्टॉलेशन आणि लाइन 3 चे आर्किटेक्चरल फिनिशिंग काम करत आहे.,
कारशेडमुळे रखडली होती मेट्रो रन..
मेट्रो – 3च्या आरेतील कारशेडबाबत सुरुवातीपासूनच गदारोळ झाला होता. त्यामुळे काम पुढे सरकत राहिलं. नंतर कारशेडचे काम पूर्ण न झाल्याने मेट्रो-3 ची सेवा सुरू होण्यास बराच विलंब झाला. वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या मुदतींची पूर्तता करणेही MMRC साठी आव्हान बनले आहे. त्यामुळेच यावेळी सरकार बदलून कारशेडच्या कामाला गती देण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला. आता आरे कारशेडचे काम जवळपास पूर्ण झाल्याने मेट्रो – 3 रुळावर धावण्याची शक्यताही वाढणार आहे. याशिवाय निवडणुकीचे वर्ष असल्याने मेट्रो – 3 चे काम पूर्ण करून अंडरग्राउंड मेट्रो चालवण्याचीही सरकार आणि प्रशासनाला घाई आहे.