Take a fresh look at your lifestyle.

Nashik Metro NEO : मनपा निवडणुकांआधी नाशिककरांना गुड न्यूज..! PMO कार्यालयाकडे DPR सादर, पहा स्टेशन्स अन् Route Map..

0

पीएमओ कार्यालयाच्या अंतिम मंजुरीअभावी दोन वर्षांपासून साइड ट्रॅकला असलेल्या नाशिक निओ मेट्रोला महापालिका निवडणुकांआधी चाल मिळण्याची शक्यता आहे. महामेट्रोचे एमडी डॉ. ब्रिजेश मिश्रा यांनी आज पीएमओ कार्यालयाच्या सचिवांसमोर निओ मेट्रोचे सादरीकरण करत, सविस्तर प्रकल्प आराखडा पीएमओ कार्यालयाकडे सुपूर्द केला. पीएमओ कार्यालयाकडून आराखड्याचा अभ्यास करून त्यात त्रुटी आढळल्यास महामेट्रोकडून त्याची पूर्तता केली जाणार आहे.

त्यानंतर हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाण्याची शक्यता आहे. देशातील पहिल्या टायरबेस्ड निओ मेट्रो प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतरही तब्बल दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरी अभावी पडून आहे.

या प्रकल्पाची मुदत यावर्षी संपत असतानाही, त्याला चालना न मिळाल्याने नाशिककर अस्वस्थ झाले होते. परंतु, गेल्या आठवड्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कोंडी फोडली.

नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपाचे भाषण करताना फडणवीस यांनी नाशिककरांच्या मनातील सल ओळखत निओ मेट्रोबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची गुड न्यूज दिली. आपल्या देशात पारंपरिक आणि कन्व्हर्टेबल अशा दोनच प्रकारच्या मेट्रो असाव्यात, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले होते.

खर्च, रूट मॅप, स्टेशन्स पाहण्यासाठी…  

👇👇👇👇👇

इथे क्लिक करा

देशभरात एकाच प्रकारचा मेट्रो प्रकल्प उभारला जावा आणि हा प्रकल्प मेक इन इंडिया असला पाहिजे व सर्व सुटे भाग आपल्या देशातच तयार व्हावेत, असा पंतप्रधानांचा आग्रह असल्यामुळे हा प्रकल्प थांबला होता; परंतु फडणवीस यांनी दिल्ली दरबारी वजन वापरल्याने अखेर नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला उशिरा का होईना चाल मिळाली असून, पीएमओ कार्यालयात या प्रकल्पाचे सादरीकरण पूर्ण झाले आहे.

आज पीएमओ कार्यालयात महामेट्रोचे एमडी मिश्रा, संचालक सुनील माथूर आणि आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निओ मेट्रोचे सचिवांसह अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले. यावेळी निओ मेट्रोचा डीपीआर देखील महामेट्रोने पीएमओ कार्यालयाकडे सादर केला.

यावेळी पीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मेट्रो संपूर्ण रचनेची माहिती घेऊन यात त्रुटी असल्या, तर संपर्क करू, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितले तसेच डीपीआरची कॉपी घेत, आता पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामेट्रोतील अडथळे हे पालिका निवडणुकांपूर्वी दूर होण्याची शक्यता बळावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.