Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका ! स्टेट बँकेकडून कर्ज घेऊन कार, घराचं स्वप्न पूर्ण करणं झालं महाग, पहा किती वाढणार तुमचा EMI ?

0

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी समोर आहे. जर तुमचं कर्ज घेऊन कार आणि घर घ्यायचे स्वप्न असेल तर आता तुमच्या EMI मध्ये मोठी वाढ होणार आहे. होय, स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 10 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढवले ​​आहे. याचा परिणाम असा होईल की वाहन, घर यासारखे कर्ज घेणं महाग झालं आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, नवीन दर काल 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. आतापासून ईएमआय EMI किंवा मासिक हप्ते महाग होणार आहे.

आता हे असतील नवे दर..

स्टेट बँकेने म्हटले आहे की, रात्रभर MCLR दर 10 bps ने वाढवून 7.85 वरून 7.95 केला आहे तर एका महिन्याचा MCLR दर 10 bps ने वाढवून 8.00 टक्क्यांवरून 8.10% केला आहे. तीन महिन्यांचा MCLR जानेवारीच्या 8.00 टक्क्यांवरून 8.10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

सहा महिन्यांचा MCLR पूर्वीच्या 8.30 टक्क्यांवरून 8.40% करण्यात आला आहे. एका वर्षाच्या मॅच्युरिटीसाठी नवीन दर 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटलं आहे. दोन वर्षांच्या मॅच्युरिटीसह MCLR 8.50 टक्क्यांवरून 8.60% करण्यात आला आहे. तीन वर्षांच्या मॅच्युरिटीसह MCL R 8.60 वरून 8.70% करण्यात आला आहे.

MCLR म्हणजे नेमकं काय ?

बँका ग्राहकांना ज्या मूळ कर्ज दराने कर्ज देतात त्याला MCLR म्हणतात. यापेक्षा कमी दराने बँक कर्ज देऊ शकत नाही. MCLR ची निर्मिती RBI ने 2016 मध्ये सर्व प्रकारच्या कर्जासाठी व्याजदर निश्चित करण्यासाठी केली होती.

या बँकांनीही वाढवले दर..

SBI पूर्वी पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही त्यांच्या कर्जदरात वाढ केली आहे. PNB ने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 25 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. बँक ऑफ बडोदाने MCLR ची किरकोळ किंमत 5 बेसिस पॉइंटने वाढवली आहे. यामुळे, MCLR पूर्वी 7.85 टक्क्यांवरून 7.90 % झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.