गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेल्या बेलापूर ते तळोजा हा नवी मुंबईतील सिडकोचा पहिल्या – वहिल्या मेट्रो मार्गावरील टप्पा क्रमांक 2 अर्थात सेंट्रल पार्क ते बेलापूर दरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. परंतु, हा मेट्रो मार्ग सुरू होण्यास आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या मेट्रो मार्गावर साडेतीन हजार कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांनी सेंट्रल पार्क ते पेंढार या टप्प्याचा प्रवास केला होता.
तेव्हा दोन महिन्यात नवी मुंबई मेट्रो सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र आज एक वर्ष संपले तरी मेट्रो अजून सुरू झालेली नाही. आता पुन्हा सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेंट्रल पार्क ते पेंढार या मार्गाांस रेल्वे बोडने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. तसेच या प्रकल्पाचा खर्च वाढल्यानं आयसीसीआय बँकेकडून 500 कोटींचे कर्ज घेण्याबाबत गेल्याच महिन्यात मंजुरी दिली आहे.
मेट्रोचा फायदा कुणाला ?
नवी मुंबई मेट्रो ही बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग नवी मुंबई शहरातील अंतर्गत भागातून जातो. या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. तळोजा ही मोटी औद्योगिक वसाहत असून कळंबोलीचे स्टील मार्केट महा-मुंबईतील सर्वात मोठे स्ट्रीलमार्केट आहे.
येथे रोज हजारो चाकरमानी ये-जा करतात. त्याच्यासाठी एनएमएमटीची बससेवा आहे ती अतिशय अपुरी आहे. यामुळेही मेटो सुरू झाल्यास या प्रवाशासह बेलापूर – तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
Navi Mumbai Metro Route Map – Line-1
नवी मुंबई मेट्रो मार्गावरील 11 स्टेशन्स पहा..
Navi Mumbai Metro Routes (Under Construction)
लाइन-1: CBD बेलापूर – पेंढार
लांबी : 11.10 Km
खर्च : रु. 3063.63 कोटी – ICCI Bank 500 कोटींचं कर्ज
सीबीडी – बेलापूर , सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर सेक्टर 14 . खाघवर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34. पाचनंद आणि पेंढार – तळोजा ही 11 स्टेशन्स या मार्गावर आहेत.