हे नवं वर्ष शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे. नवीन कृषी तंत्र आणि योजनांद्वारे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे,जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढू शकेल. खेड्यापाड्यात राहणारे अनेक शेतकरी शेतीसोबतच पशुपालनही करतात, पण आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात जास्त चालणाऱ्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत.

ज्याद्वारे तुम्ही पुढील 15 दिवसांत चांगली कमाई करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी बाजारात तीळ, गूळ आणि माव्याची मागणी वाढते, त्यामुळे शेतीसोबतच पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना तीळ आणि दुधाच्या अन्नप्रक्रिया व्यवसायात आतापासून चांगले उत्पन्न मिळू शकते.

मकर संक्रांतीसाठी तीळ का आहे खास..

हिवाळ्यात, लोकांना गरम अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. विज्ञान आणि आयुर्वेदातही तीळासारखे गरम पदार्थ सर्दीसाठी खूप चांगले असल्याचं सांगितलं आहे. मग तुम्ही तिळाच्या तेलात अन्न शिजवा किंवा त्याला गोड पदार्थासह खा. तीळ तुमच्या आरोग्याला सर्व प्रकारे फायदेशीर ठरते. बाजारात शुद्ध तिळाचे तेल 400 ते 500 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जातं.

त्याचबरोबर तिळाच्या मिठाईचे भावही सध्या बाजारात गगनाला भिडलेले आहेत. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तीळ प्रक्रियेचा व्यवसाय करू शकता. शेतकऱ्यांसाठीही हे फायदेशीर आहे, कारण अनेक वेळा तीळ पिकाला योग्य भाव बाजारात मिळत नाही. अशा परिस्थितीत, तिळाचे खाद्यपदार्थ बनवून, आपण आपल्या उत्पादनाच्या 5 पट किंमत मिळवू शकता..

कोण – कोणते खाद्यपदार्थ बनवू शकता..

राजस्थान – महाराष्ट्रामध्ये तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. याठिकाणी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तिळाच्या प्रक्रिया व्यवसायाशी जोडले जात असून, यातून शेतकरी तिळाचे तेल व इतर उत्पादने बनवून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडूनही कृषी विज्ञान केंद्रांमार्फत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिलं जातं. शेतकऱ्यांपासून गृहिणींपर्यंत किंवा कोणताही सामान्य नागरिक KVK मधून अन्न प्रक्रिया प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतो.

या दिवसांमध्ये साखर, मावा, गूळ, तीळ यांच्यापासून बनवलेल्या तिळकूट आणि मिठाईला खूप मागणी असते. या मिठाई 200 ते 600 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. तिळाची मिठाई बाजारात कायमस्वरूपी आणि तात्पुरती दुकाने, हातगाड्यांमध्ये चांगली विकली जाते, त्यामुळे मार्केटिंगची चिंता नाही. ही मिठाई काही दिवसात तयार होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या गावातील लोक किंवा घरगुती महिलांनाही या व्यवसायाशी जोडू शकता..

या सर्वांशिवाय तिळाच्या तेलाला बाजारात नेहमीच मागणी असते. खरीप हंगामात चांगले पीक आल्यास 200 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या तिळापासून 500 – 600 रुपये प्रतिलिटर किमतीचे तेल काढता येते.

या व्यवसायासाठी सरकारकडून मिळतंय अनुदान..

तुम्हाला माहिती आहे का की फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय करण्यासाठी सरकार आर्थिक मदत देखील करते. यासाठी केंद्र सरकारने मायक्रो फूड इंडस्ट्री अपग्रेडेशन स्कीम सुरू केली असून ती देशभरात लागू आहे. या योजनेत अर्ज केल्यावर, फळे, भाजीपाला, मसाले, फुले आणि धान्य यांच्या प्रक्रिया, वेअर हाऊस आणि शीतगृह, कारखाना किंवा उद्योगासाठी 35% अनुदान दिलं जातं.

तुम्हालाही या व्यवसायासाठी 35% अनुदानावर 10 लाखांचं कर्ज मिळवायचं असेल तर पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहण्यासाठी..

 

इथे क्लिक करा

याद्वारे लोणचे, मसाले, तेल, रस, मिठाई, फराळ, पापड, बेकरी, दुधाचे पदार्थ, डाळी, मैदा, शेंगदाणे असे खाद्यपदार्थ त्यांच्या स्वत:च्या ब्रँडखाली बनवून बाजारात विकता येतात. तुम्‍हाला हवं असल्‍यास, तीळ व्‍यवसायाची सुरूवात करून, तुम्‍ही इतर खाद्यपदार्थांचा समावेश करून तुमचा प्रक्रिया व्‍यवसाय वाढवू शकता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *