Take a fresh look at your lifestyle.

Omicron डेल्टा पेक्षा तिप्पट संसर्गजन्य ; राज्यातल्या 12 जिल्ह्यात Omicron ची एंट्री ; आज 11 नवे रुग्ण…

0

शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- देशात ओमिक्रॉनची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आज (मंगळवारी) राज्यात ओमिक्रॉनचे 11 नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी 8 नवी मुंबईचे, एक रूग्ण पिंपरी चिंचवड, एक रूग्ण उस्मानाबाद आणि एक रूग्ण नवी मुंबईत आढळला आहे. यासह, महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची एकूण संख्या 65 वर पोहचली आहे, तर मुंबईत बाधितांची संख्या 30 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्राच्या कोरोना टास्क फोर्सने फेब्रुवारी महिन्यात Omicron चा संसर्ग झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे, जम्मूमध्ये 3 Omicron रुग्णांचीही पुष्टी झाली आहे. त्यामुळे देशात Omicron बाधितांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे.

यापैकी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना चेतावणी दिली आहे की, Omicron व्हेरियंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमीत कमी तीनपट जास्त संसर्गजन्य आहे.

त्यांनी या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे आणि अधिक सावधगिरी बाळगण्याची आणि जिल्हा स्तरावर प्रभावी आणि योग्य निर्बंध सुनिश्चित करण्याची सूचना केली आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही लोकांमध्ये Omicron चा संसर्ग दिसून येत आहे. महाराष्ट्रात, 81% Omicron संक्रमित लोक आहेत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. इतकेच नाही तर Omicronने संक्रमित काही लोक असे आहेत त्यांनी फायझर लसीचा (Pfizer vaccine) तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस देखील घेतला आहे.

एक दिलासा देणारी बातमी म्हणजे तज्ज्ञांच्या मते, Omicronचा संसर्ग फारसा जीवघेणा नाही आणि त्याची लक्षणेही सौम्य आहेत. देशात आतापर्यंत Omicronची लागण झालेल्या एकाही रुग्णाला आपला जीव गमवावा लागला नाही. बाधितांपैकी 77 हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 65 रूग्ण कुठे कुठे आहेत ?

मुंबई – 30
पिंपरी -12
पुणे ग्रामीण – 7
पुणे महापालिका -3
सातारा – 3
उस्मानाबाद – 3
कल्याण डोंबिवली- 2
बुलढाणा-1
नागपूर-1
लातूर-1
वसई विरार-1
नवी मुंबई -1

एकूण – 65

यापैकी 34 रूग्णांना त्यांची RTPCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.