शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- तुम्ही आतापर्यंत हळद,तसेच इलायचीचे दूध पिलेच असाल, पण तुम्ही कधी लवंग टाकून दूध पिले आहेत का ? होय, लवंगीचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं आहे. याचे नियमित सेवन केल्याने विशेषत: पुरुषांना आश्चर्यकारक फायदे मिळतात. आयुर्वेदाचे सुप्रसिद्ध डॉ. अबरार मुलतानी सांगतात की, दूध आणि लवंगाचे वेगवेगळे सेवन केल्याने शरीराला फायदा होत असला, तरी पण जर तुम्ही या दोन्हीचे एकत्र सेवन केले तर तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. दुधात असलेले चरबी आणि प्रोटिन्स पुरुष हार्मोन ऍक्टिव्ह करतात. त्यामुळे लवंगासोबत दुधाचे सेवन केल्याने पुरुषांना फ्रेश देखील वाटते.
असं करा सेवन :-
दुधात लवंग मिसळून तुम्ही कधीही सेवन करू शकता, परंतु रात्रीचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरेल. शक्य असल्यास तुम्ही असल्यास लवंगाची पावडर तयार करून स्टोर करू शकता आणि दुधात मिसळून जशी लागेल तशी टाकून प्या.तुम्ही त्यात थोडासा गूळ घालून लवंगाचे दूध पिऊ शकता.
घसा खवखवण्यापासून आराम देतं :-
घशातील खवखव दूर करण्यासाठी लवंग आणि दुधाचे एकत्र सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. हिवाळ्यात अनेकदा घसादुखी किंवा कफ येण्याची समस्या उद्भवते, घसा दुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रात्री दुधात लवंग पावडर मिसळून सेवन करू शकता.
वंध्यत्व (Infertility) रामबाण उपाय :-
आजकाल विवाहित लोकांमध्ये वंध्यत्वाची (Infertility) समस्या खूप सामान्य झाली आहे.वंध्यत्व (Infertility) म्हणजे शरीरात काही गोष्टींच्या कमतरतोमुळे वांझपणा येतो. तसेच काही प्रकरणांमध्ये, पुरुषांच्या शुक्राणू पेशी कमकुवत असतात, ज्यामुळे स्त्रियांच्या अंडे फर्टिलाइज होतात. दुसरीकड, महिलांच्या अनियमित ओव्हुलेशनमुळे, फर्टिलिटी पीरियड निश्चित होत नाही. वंध्यत्वाची (Infertility) समस्या अनेक लोकांच्या वजनाशी देखील संबंधित असते. लवंग खाल्ल्याने वजन कमी होतं, साखर देखील कमी होते. हे पुरुषांमधील शुक्राणू अन् संभोग टायमिंग वाढवतं. महिलांची याचं सेवन केलं तर मासिक पाळी नियमित येते.
स्ट्रेस आणि टेंशन दूर करतं:-
लवंगाचे सेवन केल्याने मन शांत राहते. ज्यामुळे मूडही खुलून राहतो. हे डिप्रेशन आणि चिंता (एंग्जाइटी) पासून दूर ठेवते.
सेक्सुअल स्टेमिना वाढवते :-
पुरुषांमधील कामवासना म्हणजेच लव्ह हार्मोन वाढवणारा कारक लवंगला मानला जातो. चीनमध्ये सेक्सुअल पावर वाढवण्यासाठी लोक लवंगाचे सेवन करतात. हे पुरुषांच्या टिश्यूज ऊतींना रक्त प्रवाह देखील वाढवते.