Take a fresh look at your lifestyle.

BSNL चा शानदार प्लॅन, 300 दिवसांची व्हॅलिडिटी ; रोज 2GB डेटा, फ्री कॉलिंग प्राईस फक्त….

0

शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने त्यांचे प्रीपेड प्लॅन खूपचं महाग केले आहेत. दुसरीकडे, सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL बद्दल बोलायचं झालं तर, ती अजूनही सर्वोत्तम डेटा आणि कमी किंमतीत सर्वोच्च वैधतेसह फ्री कॉलिंगसह काही उत्कृष्ट योजना ऑफर करत आहे.

असाच एक प्लॅन 397 रुपयांचा आहे. BSNL च्या या प्लॅनमध्ये 300 दिवसांच्या वैधतेसह डेटा, मोफत SMS आणि फ्री कॉलिंग दिलं जात आहे.

BSNL चा हा प्लॅन Jio, Airtel आणि Vodafone च्या 400 रुपयांच्या प्लॅनपेक्षा उत्तम ठरू शकतो. त्यामुळे या प्लॅनसह BSNL Jio, Airtel आणि Vodafone-Idea पेक्षा स्वस्तात अन् दुप्पट फायद्याचा ठरू शकतो.

BSNL चा रु.397 चा प्लान :-

BSNL च्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. कंपनी या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंगची ऑफर देत आहे. या प्लॅनमध्ये मोफत PRBT देखील उपलब्ध आहे ज्यात दररोज 100 फ्री SMS उपलब्ध आहेत.

कंपनीच्या या प्लॅनची ​​वैधता 300 दिवसांची आहे, यामध्ये मिळणारे फायदे फक्त 60 दिवसांसाठी वापरता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.