Take a fresh look at your lifestyle.

Onion Price : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, या बाजार समितीत कांद्याला 2 हजार 651 चा दर, पहा आजचे कांदा बाजारभाव..

0

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर 2 हजार 45 वाहनांमधून सर्वाधिक 40 हजार 118 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान 700 हजार तर कमाल 2 हजार 651 रुपये दर मिळाला. यंदाच्या हंगामातील ही विक्रमी आवक ठरली आहे.

रविवारी साप्ताहीक सुट्टीमुळे कांदा लिलाव बंद असल्याने सोमवार, मंगळवार आणि आता बुधवारीही कांदा विक्रीसाठी शेतकरी बांधवांनी एकच गर्दी केली आहे .

बाजार आवारावर आलेल्या मालाचे लिलाव पुर्ण करण्याच्या दृष्टीने अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व बाजार समितीच्या सेवकांनी जलदगतीने लिलाव प्रक्रिया पुर्ण केल्याने विक्रमी कांदा आवकेचा लिलाव वेळेत पुर्ण झाल्याची माहिती सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.

सध्या खरीप पिकाच्या पेरणीचा हंगाम असल्याने शेतकरी बांधवांना मशागतीचे कामे, बि – बियाणे, रासायनिक खते, औषधे आदी कामांसाठी आर्थिक निकड भासत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे.

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता त्याच दिवशी लिलाव पुर्ण करून शेतकरी बांधवांना रोख चुकवती केली जात आहे. बाजार आवारावर विक्रीस आलेल्या शेतीमालाचे वेळेत लिलाव व वजनमाप होत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रसंगी उपसभापती गणेश डोमाडे, सचिव नरेंद्र वाढवणे आदींसह कर्मचारी व संचालक उपस्थित होते.

निफाड, विंचूरलाही विक्रमी आवक लासलगाव पाठोपाठ बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारावरही कांद्याची सर्वाधिक आवक झाली. निफाड उपबाजार आवारावर 668 वाहनांमधून 6 हजार 60 क्विंटल कांदा विक्रीस आला. त्यास सररासरी 1 हजार 350 रुपये दर मिळाला. विंचुर उपबाजार आवारावर 30 हजार 300 क्विंटल कांद्याची आवक झाली होती..

पहा आजचे कांदा बाजारभाव..

Leave A Reply

Your email address will not be published.