अखेर कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला. राज्यातील बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये सोमवारी 1800 रुपये पार क्विंटल दराने विकला गेलेला कांदा मंगळवारी म्हणजेच दुसऱ्याच दिवशी 2,700 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. एकाच दिवसात प्रती क्विंटल मागे तब्बल 800 रुपयांची दरवाढ शेतकऱ्यांना मिळाली.

दरवाढीचे कारण काहीही असो परंतु दरवाढ झाली याचा शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसून आला. याच आनंदाच्या भरात 2,500 दराची पावत्या शेतकऱ्यांकडून सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झालेली बघायला मिळाली. यावरून शेतकऱ्यांचा आनंद स्पष्टपणे दिसून आला.

गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांना अत्यल्प पावसाचा मोठा फटका बसला. त्यात वाचलेल्या पिकांना म्हणावा तसा भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही फिटला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. आजरोजी शेतकऱ्यांनी वर्षभरात पिकवलेला जवळपास सर्वच शेतमाल विक्री केलेला आहे.

त्याला कांदा अपवाद होता. याच कांद्यावर आता शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. सुरूवातीपासून भाव कमी उन्हाळी कांदा निघायला सुरुवात झाली. तेव्हापासून कांद्याला 700 ते 1400 रुपयांच्या जवळपास प्रतिक्विंटल भाव मिळत होता. यंदा कांदा उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचे झालेले हाल पाहता हा भाव अत्यंत तोकडा होता. परंतु गरज असलेल्या शेतकऱ्यांना याच भावात कांदा विकावा लागला .तर, अनेकांनी या भावात कांदा विकायला नकार देऊन तो साठवून ठेवला तो भाव वाढेल या अपेक्षेने आज कांद्याच्या भावात तेजी आली आहे.

त्याचे निश्चितच स्वागत आहे. परंतु, ज्याप्रमाणे खतं, बी, बियाण्यांचे तसेच मजुरीचे हमीभाव आहे. त्याच पद्धतीने सर्वच शेतमालाचे हमीभाव कायमस्वरूपी असले पाहिजे.

कोणत्या बाजार समितीत किती मिळाला दर ?

7 मे रोजी पुणे बाजार समितीत आतापर्यंत 15,976 क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान 1700 रुपये, कमाल 2100 रुपये आणि सरासरी 1750 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

कामठीतील बाजारात 240 क्विंटल कांद्याची आवक झाली. असे असताना किमान भाव 1500 रुपये, कमाल 2500 रुपये आणि सरासरी 2000 रुपये प्रतिक्विंटल होता.

सोलापूर बाजार समितीत काल 6 मेला तब्बल 33313 क्विंटल कांद्याची आवक झाली. असे असताना किमान भाव 1600 रुपये प्रतिक्विंटल राहिला. कमाल भाव 2,700 रुपये आणि सरासरी भाव 2000 रुपये प्रतिक्विंटल होता..

लासलगाव – विंचूर बाजार समितीतत आज सकाळपासून 15300 क्विंटल कांद्याची आवक झाली. असे असतानाही किमान भाव फक्त 1000 रुपये, कमाल 2001 रुपये आणि सरासरी 1800 रुपये प्रतिक्विंटल होता..

प्रतिकिया..

केंद्र सरकारकडून निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कांद्याच्या भावामध्ये चांगलीच तेजी आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय केंद्र सरकारने कायम ठेवला ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक त्यांना निश्चितच घामाचा दाम मिळेल. –

किशोर नरोडे, व्यापारी.

आज मिळत असलेला कांद्याला भाव उद्या मिळेल का ? याची शेतकऱ्यांना शाश्वती नाही. त्यामुळे आज जरी भाव असला तरी उद्या काय होईल? हे शेतकऱ्यांना सांगता येत नाही. त्यामुळे हमीभावाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. –

रमेश कऱ्हाळे कांदा उत्पादक शेतकरी, शिरेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *