सप्टेंबर 2022 च्या घरकुल याद्या प्रसिद्ध ; पहा, यादीत तुमचं नाव आहे का ? आपल्या गावाची PDF यादीही मोबाईल मध्ये फक्त 2 मिनटात….
शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 :- Pradhan Mantri Awas Yojana : स्वतःचं घर असावं असं सर्वांचं स्वप्न असतं, ते पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना घरे बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाते.
देशातील लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, यासोबतच या योजनेअंतर्गत लोक आजही त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. या योजनेंतर्गत मैदानी भागात घरे बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये आणि डोंगराळ भागात 1 लाख 30 हजार रुपये शासनाकडून दिले जातात.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत नवी यादी : 2022 ची प्रसिद्ध झाली असून ती ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. खालील काही स्टेप्स फॉलो करून यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव देखील तपासू शकता…
पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासा :-
सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या https://rhreporting.nic.in/netiay/SECCReport/report_categorywiseseccverification.aspx या वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही शोधलेल्या गावाच्या गृहनिर्माण योजनेची यादी : 2022 दिसेल. (ही सर्व प्रोसेस करताना तुम्हाला वजाबाकी किंवा बेरीज करून उत्तर द्यायचं आहे )
तसेच तुम्ही तुमच्या गावाची PDF यादीही डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला Download PDF या ऑप्शनवर क्लिक करू शकता. अशाप्रकारे काही स्टेप्स फॉलो करत तुम्ही तुमचं नाव पाहू शकता…
2024 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट :-
केंद्र सरकारने 2024 पर्यंत देशातील सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2016 मध्ये सरकारने ही योजना सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत 1.73 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
वारंवार अर्ज करूनही घरकुलात नाव येईना ; आता इथे करा तक्रार, नक्कीच मिळेल लाभ !
वारंवार अर्ज करूनही घरकुलात नाव येईना ; आता इथे करा तक्रार, नक्कीच मिळेल लाभ !