आजच्या काळात, सर्व आवश्यक कागदपत्रांमध्ये, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज झाले आहेत ज्याचा उपयोग प्रत्येक सरकारी सुविधा आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केला जातो. याशिवाय प्रत्येक प्रकारच्या बँकिंग आणि आर्थिक कामांसाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सरकारने दोन्ही डॉकॉमेन्ट लिंक करणे बंधनकारक केले आहे.

1000 रुपये दंड भरावा लागतोय दंड..

पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख सर्वोच्च न्यायालयाने जारी केली होती. त्याचप्रमाणे 31 मार्च 2023 नंतर आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागत आहे. अशा परिस्थितीत सर्व भारतीय नागरिकांनी 31 मार्च 2023 पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर तुमचा पॅन आधारशी लिंक झाला आहे की नाही ? हे कसे शोधायचे असा प्रश्न निर्माण होत असला तरी, याची प्रक्रिया खूप सोपी आहे, जेणेकरून तुमचा पॅन आधारशी लिंक झाला आहे की नाही हे 2 मिनिटांत तुम्ही घरी बसून शोधू शकता..

जूनपर्यंत 10 हजारांवर जाणार दंड..

जर तुम्ही वेळेत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर पुढील महिन्यापासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाणार असून दंडात 9 हजारांची वाढ होणार आहे. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड अद्याप आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर ते लवकरात लवकर लिंक करा. आज आपण या लेखाद्वारे पॅन आधार लिंक करण्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पॅनशी – आधार लिंक आहे हे ऑनलाइन असे करा चेक..

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या देखील हे काम अगदी सोप्या पद्दतीने करू शकता. त्यासाठी दिलेल्या स्टेप्स पूर्ण करा.

यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल

यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करू शकता – incometax.gov.in

या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर व आधार नंबर टाऊन View Link Adhar Stetus वर क्लिक करावं लागेल.

यानंतर लिंक असेल तर Your PAN ASXXXXXX4B is already linked to given Aadhaar 43XXXXXXXX72 असा मॅसेज आला तर लिंक आहे असं समजा..

पॅनशी – आधार लिंक कसे कराल ?

आयकर चे ई-फायलिंग पोर्टल उघडा.

या साठी दिलेल्या लिंक चा वापर करू शकता – https://incometaxindiaefiling.gov.in/

जर तुम्ही येथे आधी नोंदणी केली नसेल तर कृपया नोंदणी करा. तुमचा पॅन क्रमांक हा तुमचा युझर आयडी असेल.

आता यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.

एक पॉप अप विंडो दिसेल, ज्यावर तुम्हाला आधारशी पॅन लिंक करण्याचा पर्याय दिलेलं. जर ते येत नसेल तर ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.

आता पॅनवर प्रविष्ट केलेली जन्मतारीख आणि लिंग तपशील येथे आधीच दिसत असतील.

आता हि सर्व माहिती तुमच्या आधारशी मिळती जुळती आहेका हे पहा. जर हि माहिती दोन्ही कागदपत्रांमध्ये सारखी नसेल, तर तुम्हाला चूक दुरुस्त करावी लागेल.

जर सर्व माहिती जुळत असेल, तर तुमचा आधार क्रमांक टाका आणि “आता लिंक करा” बटणावर क्लिक करा.

तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक झाला आहे हे कळवणारा एक पॉप-अप संदेश दिसेल.

तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ ला देखील भेट देऊ शकता.

तुम्ही एसएमएसद्वारे देखील पॅन-आधार लिंक करू शकता.

तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करा. 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाका. आता 567678 किंवा 56161 वर हा मेसेज पाठवा. पॅन-आधारच्या ऑनलाइन लिंक करण्यासाठी काही समस्या असल्यास, ते NSDL आणि UTITSL च्या पॅन सेवा केंद्रावरून ऑफलाइन देखील केले जाऊ शकते.

या पद्धतीने भरा दंड..

CBDT ने 30 जून 2022 नंतर PAN ला आधारशी जोडल्याबद्दल 1000 रुपयांचा दंड ठोठावला होता.

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल.

यासाठी तुम्हाला https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean वर जावे लागेल.

आता CHALLAN NO/ITNS 280 वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Tax Applicable पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंटचा पर्याय निवडू शकता.

आता तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि कॅप्चा भरा आणि पुढे जा वर क्लिक करा.

यासह, पॅन-आधार लिंकसाठी विलंब शुल्क भरले जाईल.

पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे कसे तपासायचे.

जर तुम्हाला आठवत नसेल तर तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे देखील तुम्ही पाहू शकता. या साठी तुम्ही 567678
किंवा 56161  वर..

UIDPAN < 12 अंकी आधार क्रमांक> < 10 अंकी पॅन खाते क्रमांक>
या फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवून तुम्ही पॅन आधार लिंक आहे कि नाही हे पाहू शकता.
वेब पोर्टल वापरून पॅन-आधार लिंकिंगची स्थिती तपासा.
UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा .
“आधार सेवा” मेनूमधून “आधार लिंकिंग स्थिती” निवडा.
आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि “Get Status” बटणावर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, तसेच कॅप्चा कोड टाकावा लागेल.
तुमच्या पॅन-आधार लिंकिंगची स्थिती तपासण्यासाठी “Get Linking Status” वर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की तुमचा आधार पॅनशी लिंक झाला आहे की नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *