Mumbai To Pune : जगातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा महाराष्ट्रात, 13Km साठी 7000 कोटींचा खर्च, या दिवशी होणार खुला; पहा रोडमॅप..

0

मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग खंडाळा घाटातील वळणदार रस्त्यांपासून मुक्त करणाऱ्या दोन्ही बोगद्यांचे 50% काम पूर्ण झालं आहे. यातील एक बोगदा 1.75 किमी लांबीचा आणि दुसरा 8.93 किमी लांबीचा असणार आहे. 

लांबीच्या बाबतीत हे दोन्ही बोगदे भारतातील इतर बोगद्यांपेक्षा जास्त मोठे आहेत, पण रुंदीच्या बाबतीतही ते जगातील सर्व बोगद्यांना मागे टाकतील. 23 मीटर रुंदीचे दोन्ही बोगदे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे बोगदे असतील. त्यात चार मार्गिका असतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मात्र या बोगद्यांच्या कामाची डेडलाइन सातत्याने वाढत आहे. लॉकडाऊनमुळे प्रथम त्यांच्या कामात व्यत्यय आला, त्यानंतर मार्च 2024 ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. आता या दोन्ही बोगद्यांचे काम जानेवारी 2025 मध्येच पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अर्ध्या तासांचा वेळ वाचणार..

हे दोन्ही बोगदे लोणावळ्यातील तलावाखालून जाणार आहेत. त्यांच्या बांधकामानंतर मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. द्रुतगती मार्गावरील खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किमीवरून 13.3 किमी इतके कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासात सुमारे अर्धा तासाची बचत होणार आहे.

वाहतुकीला मिळणार दिलासा..

या बोगद्याला एक्सप्रेस – वेशी जोडण्यासाठी केबल – स्टेड ब्रिज बांधण्यात येत आहे. त्याच्या महाकाय खांबांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आडोशी बोगद्यापासून खंडाळा टोकापर्यंतच्या एक्स्प्रेस वेवर सध्या सर्वाधिक वाहतूक आहे. जुना मुंबई – पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग दोन आणि चार लेन सोबत धावतात. यातून लोकांना दिलासा मिळणार आहे. यासोबतच या भागात दरड कोसळून अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळेही दिलासा मिळणार आहे.

चीनचा सर्वात रुंद बोगदा..

शांघाय शहराला चीनमधील चांगक्सिंग बेटाला जोडणारा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे ज्याची रुंदी 13.7 मीटर आहे. हा 16.62 किलोमीटर लांबीचा बोगदा यांगझी नदीखालून जातो. मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेचा खंडाळा बोगदा यापेक्षा 23 मीटर रुंद असणार आहे.

भारतातील सर्वात लांब बोगदे..

पिरपंजाल रेल्वे बोगदा – 12.2 किमी.

त्रिवेंद्रम बंदर रेल्वे – 9.02 किमी.

अटल बोगदा – 8.5 किमी.

बेनिहाल बोगदा – 8.5 किमी.

Leave A Reply

Your email address will not be published.