Take a fresh look at your lifestyle.

Farmer Success Story : ‘या’ पिकाच्या लागवडीने शेतकऱ्याचं नशीब बदलतंय..! फक्त 40 दिवसांत शेतकऱ्यांना करतंय मालामाल

0

पारंपारिक पिकांच्या लागवडीत शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. कधी पाऊस तर कधी भीषण दुष्काळ याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. इतर वर्षांच्या तुलनेत यंदा गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच मोठे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी नवीन पिकांकडे वळत आहेत. अलीकडे शेतकरी स्ट्रॉबेरी पिकातही रस दाखवू लागले आहेत.

महाराष्ट्र राज्यातही महाबळेश्वर वगळता विदर्भातही सध्या स्ट्रॉबेरीची लागवड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रुचकर चवीमुळे आणि औषधी मूल्यामुळे ते मोठ्या उत्साहाने खाल्ले जात आहे. छत्तीसगड राज्यातील जशपूर, अंबिकापूर आणि बलरामपूर जिल्ह्यात अनेक शेतकरी त्याची लागवड करत आहेत. स्ट्रॉबेरीला मागणी असल्याने स्थानिक पातळीवर त्याचा वापर केला जात आहे. त्याच्या लागवडीच्या फायद्यांमुळे शेतकरी सतत आकर्षित होत आहेत. एक एकर शेतात याच्या लागवडीतून कमीत- कमी 4 ते 5 लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

जशपूर जिल्ह्यात 25 शेतकऱ्यांनी 6 एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. जशपूरमध्ये विंटर डॉन जातीच्या स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना उद्यान विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या योजनेंतर्गत तांत्रिक मार्गदर्शन व इतर मदत मिळत आहे. छत्तीसगडमध्ये उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीचा दर्जा चांगला असून स्थानिक उत्पादनामुळे व्यापाऱ्यांना ताजी फळे मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

थंड हवामान आवश्यक..

भातापेक्षा स्ट्रॉबेरीची शेती अनेक पटींनी अधिक फायदेशीर आहे. भातशेतीसाठी जमिनीची सुपीकता तसेच जास्त पाणी आणि तापमान आवश्यक असताना, स्ट्रॉबेरीची लागवड सामान्य जमिनीत आणि सामान्य सिंचनातही करता येते. यासोबतच भातशेतीमध्ये जिथे जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, तिथे स्ट्रॉबेरीची काळजी घेण्याची गरज कमी आहे. यासाठी फक्त थंड हवामान आवश्यक आहे. एका एकरात भातापासून सुमारे 50 हजार रुपयांचे उत्पन्न घेता येते, तर स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून 4 ते 5 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. अशा प्रकारे धानापेक्षा 8 ते 9 पट उत्पन्न मिळते.

जिल्ह्यात 75000 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन होणार..

जशपूरमधील अनुकूल वातावरण लक्षात घेऊन 25 शेतकऱ्यांनी 6 एकरात स्ट्रॉबेरीचे पीक घेतलं आहे. या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि डिसेंबरमध्ये झाडांना फळे येऊ लागली. फळे येताच शेतकऱ्यांनी हरितक्रांती आदिवासी सहकारी समितीच्या माध्यमातून किंवा स्वत:हून चांगले पॅकेजिंग केले. पॅकेजिंगमुळे काही वेळात चांगली किंमत मिळू लागली.

25 शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रोपांची लागवड केली आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला सुमारे 40 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. स्ट्रॉबेरीच्या झाडांना मार्चपर्यंत फळे येतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एका शेतकऱ्याला सुमारे 1 ते 1.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्याचबरोबर एका शेतकऱ्याकडून सुमारे 3000 किलो स्ट्रॉबेरी फळाचे उत्पादन होण्याची शक्यता असून सर्व शेतकऱ्यांकडून एकूण 75000 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

मल्चिंग आणि तांत्रिक मदत..

जशपूरचे शेतकरी धनेश्वर राम यांनी सांगितले की, पूर्वी त्यांच्याकडे काही जमीन होती जी फारशी सुपीक नव्हती. क्वचितच काही प्रमाणात धानाचे पीक घेता आले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी या फळाची लागवड सुरू केल्यावर त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. यासोबतच नाबार्ड संस्थेचेही सहकार्य मिळाले.

25 डेसिमलच्या शेतात स्ट्रॉबेरीची 2000 रोपे लावल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यांत चांगली फळे आली आहेत. त्यासाठी त्यांना बाजारात 400 रुपये किलो भाव मिळत आहे. आतापर्यंत त्यांना सुमारे 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाकडून मल्चिंग आणि तांत्रिक मदत मिळाली आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर..

स्ट्रॉबेरीचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. हे फळ व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आणि के चा खूप चांगला स्त्रोत आहे. डॉक्टरांच्या मते, या फळाचा उपयोग चेहरा, डोळ्यांच्या तेजासह दातांची चमक वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय कॅल्शियम मॅग्नेशियम फॉलिक अँसिड फॉस्फरस पोटॅशियम यामध्ये आढळते. यामुळेच स्ट्रॉबेरीची फळे बाजारात महागड्या दराने विकली जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.