Take a fresh look at your lifestyle.

12 कोटी शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ! शासनाची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी 11 वाजता खात्यात जमा होणार ₹ 2000 हप्ता, चेक करा आपलं नाव

0

शेतीशिवार टीम : 15 ऑक्टोबर 2022 :- पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याची (PM Kisan 12th Installment) वाट पाहत असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दिवाळीपूर्वी, मोदी सरकार या आठवड्यात देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 व्या हप्त्याअंतर्गत 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे.

17 ऑक्टोबर रोजी 11 वाजता खात्यात येणार पैसे :-

कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पीएम किसान चा 12 वा हप्ता जारी करणार आहेत. 17 ऑक्टोबर रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीच्या फेअर ग्राउंड IARI पुसा येथे पंतप्रधान मोदी ‘पीएम किसान संमेलन 2022’ ला संबोधित करणार आहे अन् त्या कार्यक्रमात मोदी 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे.

इतका विलंब का झाला ?

या योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी (E-KYC) अनिवार्य केलं आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्यापही ई-केवायसी (E-KYC) केलं नसेल, तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन अजूनही तुम्ही तुमची ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करा.

तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा ?

सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा. होम पेजवर मेनूबारवर जा आणि ‘फार्मर कॉर्नर’ वर जा.

येथे Beneficiary List वर क्लिक / टॅप करा. हे केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल.

येथे तुम्ही राज्यातील ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडा.

यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्या टॅबमध्ये तहसील किंवा उपजिल्हा, चौथ्यामध्ये ब्लॉक आणि पाचव्या क्रमांकावर तुमच्या गावाचे नाव निवडा.

यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी तुमच्या समोर ओपन होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.