देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत, इंधनाचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत, त्यामुळे ड्रायव्हिंगचा खर्च खिशाला परवडेनासा झाला आहे, त्यामुळे CNG गाड्या अजूनही स्वस्त आणि चांगला ऑप्शन ठरत आहे. आता अशा परिस्थितीत जर तुम्ही या सणासुदीच्या सिझनमध्ये परवडणारी सीएनजी कार (CNG Car) घेण्याचा विचार करत असाल, तर आज आपण टॉप 5 स्मॉल सीएनजी कारबद्दल (CNG Cars) जाणून घेणार आहोत. ही मॉडेल्स केवळ किमतीतच स्वस्त नाहीत तर चालण्याच्या खर्चातही खूप किफायतशीर आहेत आणि ते तुमचे मासिक बिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

Maruti Suzuki S-Presso CNG (मायलेज : 32.73Km/kg ) :-

मारुती सुझुकीची S-Presso आता CNG व्हर्जनमध्येही आजचं लॉन्च झाली आहे. यामध्ये Next Gen K-Series – 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे, जे 56.69 PS पॉवर आणि 82.1Nm टॉर्क जनरेट करते. कार 32.73Km/Kg मायलेज देते ज्यामुळे ती किफायतशीर कार बनते. तर पेट्रोल मोडवर ही कार 25Km पेक्षा जास्त मायलेज देते.

यात 5 स्पीड मॅन्युअल आणि AGS गिअरबॉक्सची सुविधा आहे. एवढंच नाही तर हे इंजिन आयडल-स्टार्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. या टेक्नॉलॉजी मुळे इंधनाची बचत होते. S-Presso LXi S-CNG ची किंमत 5.90 लाख रुपये आहे तर S-Presso VXi S-CNG ची किंमत 6.10 लाख रुपये आहे. CNG किट व्यतिरिक्त यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

Maruti Suzuki Alto 800 CNG (मायलेज : 31.59Km/Kg) :-

मारुतीची Alto 800 CNG ही अतिशय किफायतशीर कार आहे, जी दैनंदिन युजसाठीही जबरदस्त ऑप्शन आहे. या कारमध्ये 800cc इंजिन आहे जे CNG मोडवर 40 HP पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कार 31.59Km / Kg मायलेज देण्याचे वचन देते. Alto 800 CNG ची एक्स-शोरूम किंमत 5.03 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Celerio CNG (मायलेज : 31.59Km/Kg) :-

नव्या अवतारात आल्यानंतर मारुती सेलेरियोने (Suzuki Celerio) लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. ही कार नुकतीच CNG किटसह लॉन्च करण्यात आली आहे. हे 1.0-लिटर K10C इंजिने समर्थित आहे जे CNG मोडमध्ये 57hp पॉवर आणि 82Nm टॉर्क जनरेट करते. कार 35.60 Km/Kg मायलेज देण्याचा दावा करते. Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki WagonR CNG (मायलेज : 34.04Km/Kg) :-

फॅमिली कार वॅगनआर सीएनजी (Suzuki WagonR) देखील तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. हे 1.0-लिटर K10C इंजिनद्वारे समर्थित आहे जे CNG मोडमध्ये 57hp पॉवर आणि 82Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 34.04Km/Kg मायलेज देते. कारची किंमत 6.42 लाख रुपये (Ex-showroom) आहे.

Tata Tiago iCNG (मायलेज : 26.49 Km/Kg) :-

Tata Tiago iCNG हा एक उत्तम ऑप्शन आहे कारण ती CNG मोडवर सुरू होणारी पहिली कार आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 6,27,900 ते 7,79,900 रुपये आहे. ARAI नुसार, ही कार एक किलो CNG मध्ये 26.49 Km/Kg मायलेज देते. कार फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटसह येते. Tiago iCNG 1.2-लिटर रेव्होट्रॉन इंजिनद्वारे समर्थित आहे जे 73PS पॉवर देते. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प, ड्युअल-टोन रूफ, रेन सेन्सिंग वायपर्स यांसारखे फिचर्स देण्यात आले आहे. तसेच या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *