दिवाळीला Scorpio सह ‘या’ 4 SUVs वर 3 लाखांपर्यंत डिस्काउंट ऑफर ; SUVs लव्हर्ससाठी चांगली संधी, पहा डिटेल्स
जर तुम्ही या सणासुदीच्या मोसमांत मोठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. होय, कारण सध्या SUV सेगमेंटमधील अनेक वाहनांवर दिवाळी ऑफर सुरू झाली आहेत. या सणासुदीच्या हंगामात SUV प्रेमींना काही फ्लॅगशिप SUVs वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे, चला तर मग टॉप 5 SUVs डिस्काउंट बद्दल जाणून घेउया..
महिंद्राच्या बिग SUV वर बंपर डिस्काउंट :-
महिंद्राची सर्वात मोठी SUV ALTURAS G4 या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याचं कारण म्हणजे हे वाहन खरेदी केल्यावर ग्राहकांना एकूण 3 लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर ALTURAS G4 वर दिवाळीपूर्वीच मिळणार असून या SUV वर सध्या सर्वात जास्त डिस्काउंट उपलब्ध आहे.
स्कॉर्पिओच्या जुन्या मॉडेलवर 2 लाखांचा बंपर डिस्काउंट :-
या लिस्टमध्ये स्कॉर्पिओचे जुने मॉडेल स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या SUV वर 2 लाखांहून अधिक डिस्काउंट दिला आहे. यामुळेच लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये 1.75 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट, 20,000 रुपयांच्या फ्री ॲक्सेसरीज, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
Tata Harrier वर कॅश डिस्काउंट :-
या सणासुदीच्या हंगामात, जेट एडिशन वगळता टाटा एसयूव्हीच्या सर्व व्हेरियंटवर 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. कंपनी आपल्या दुसऱ्या SUV सफारीवरही हा डिस्काउंट आणि ऑफर देत आहे.
इलेक्ट्रिक कार Kona SUV वर कॅश डिस्काउंट :-
तिसऱ्या क्रमांकावर इलेक्ट्रिक कार KONA SUV Hyundai आहे. भारतातील Hyundai ची एकमेव इलेक्ट्रिक कार आहे, Kona SUV वर प्रचंड डिस्काउंट सुरू आहे. कोरियन कार निर्माता इलेक्ट्रिक वाहनावर 1 लाख रुपयांचा फ्लॅट कॅश डिस्काउंट देत आहे, जी भारतातील कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सर्वाधिक आहे.
फोक्सवॅगन Taigun वर डिस्काउंट :-
या सणासुदीच्या मोसमात, Volkswagen च्या या आलिशान SUV च्या 1.0L व्हेरियंटवर रु. 30,000 पर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे तर 1.5L व्हेरियंटवर 55,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय, या एसयूव्हीच्या 1.5 लीटर GT DSG व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंतचे फायदेही उपलब्ध आहेत.