शेतीशिवार टीम : 29 मार्च 2022 : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता अनिवार्य असलेली eKYC ही 22 मे पर्यंत पूर्ण करता येणार आहे.
यापूर्वी त्याची अंतिम तारीख 31 मार्च होती. PM किसानचा पुढचा म्हणजे 11 वा हप्ता 1 एप्रिल 2022 नंतर कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो, परंतु जर तुम्ही ई-केवायसी (eKYC) पूर्ण केले नसेल तर 2000 रुपयांचा हप्ता रोखला जाऊ शकतो…
PM किसान पोर्टलवर सध्या Ekyc साठी काय आहे, स्थिती…
पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) संदेश प्रसारित केला जात आहे. त्यात म्हटलं आहे की, PM किसान रजिस्टर्ड शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. परंतु, सध्या पीएम किसान पोर्टलवर काही प्रॉब्लेम आढळून येत आहे, जसे की, साईट ओपन न होणं, OTP न येणं, तसेच मोबाईलवर अडथळा अडथळा येणं. परंतु बरेच शेतकरी असे हे की, मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक नसणे, यामुळे हे अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्ही जवळच्या CSC सेंटर वर जाऊन बायोमॅट्रिकही करू शकता…
याबाबत UIDAI कडूनही प्राप्त झालेल्या अधिसूचनेनुसार, UIDAI च्या OTP सेवा अधूनमधून जारी केल्यामुळे, OTP व्हेरिफिकेशन करताना कालबाह्य आणि प्रतिसादात विलंब होत आहे. त्यामुळे ई-केवायसी (eKYC) पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 ही होती, ती आता काढून टाकण्यात आली असून पोर्टलवरील नवीन अंतिम मुदत आता 22 मे 2022 आहे.
ई-केवायसी (eKYC) कशी कराल पूर्ण :-
स्टेप 1 : यासाठी, प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राउझरच्या क्रोम सारख्या आयकॉनवर टॅप करा आणि तेथे pmkisan.gov.in टाइप करा. आता तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुख्यपृष्ठ मिळेल, त्याच्या तळाशी जा आणि तुम्हाला ई-केवायसी लिहिलेलं दिसेल. यावर टॅप करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर टॅप करा.
स्टेप 2 : आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल. प्रदान केलेल्या बॉक्समध्ये ते टाइप करा.
स्टेप 3 : यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन साठी बटणावर टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. तो भरा आणि सबमिट वर टॅप करा.
जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल. असे झाल्यास तुमचा हप्ता उशीर होऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश दिसेल.
PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आणखी 12 कोटी शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झालं आहे. ज्यांच्या खात्यात 2000 इतकी रक्कम पोहोचली आहे .
कधी जमा होणार 11वा हप्ता…
या योजनेंतर्गत, प्रत्येक आर्थिक वर्षात, मोदी सरकार शेतकऱ्यांना 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. याअंतर्गत दरवर्षी पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. अशा परिस्थितीत 1 एप्रिलनंतर 11 वा हप्ता येणार आहे.
हिंदू नववर्षाच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला किंवा रामनवमीच्या दिवशी 10 एप्रिलला पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याची रक्कम पाठवण्याची शक्यता आहे.