शेतीशिवार टीम : 30 मार्च 2022 : सध्या सुरू असलेल्या या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 6 सरकारी कंपन्या विकण्याचा प्लॅन मोदी सरकारने आखला असून त्यामध्ये बीपीसीएल (BPCL) व्यतिरिक्त बीईएमएल (BEML), शिपिंग कॉर्प (Shipping Corp), पवन हंस (Pawan Hans) , सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. (CEL) आणि नीलांचल इस्पात (NEELACHAL ISPAT NIGAM LTD) यांचा यामध्ये समावेश असून आता यामध्ये अजून एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे दिग्गज ऑयल एंड गॅस प्रॉड्यूसर कंपनी ओएनजीसी (ONGC).
केंद्र सरकार या आठवड्यात देशातील दिग्गज ऑयल एंड गॅस प्रॉड्यूसर कंपनी ओएनजीसी (ONGC) मधील 1.5% टक्क्यांपर्यंतचा हिस्सा विकणार आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मधील हिस्सेदारी विकून सरकार सुमारे 3,000 कोटी रुपये उभे करणार आहे.
ONGC ने मंगळवारी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, कंपनीचा इश्यू दोन दिवस खुला राहणार आहे. ONGC चा इश्यू 30 मार्चला उघडेल आणि 31 मार्चला बंद होणार आहे.
विक्री ऑफरसाठी 159 रुपये प्रति शेअर फ्लोअर प्राईस :-
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने मंगळवारी दिलेल्या माहितीत सांगितले की, “कंपनीच्या प्रवर्तकाने म्हणजेच सरकारने 94,352,094 इक्विटी शेअर्सची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कंपनीच्या एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 0.75% आहे. हा इश्यू बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 31 मार्च रोजी खुला होईल. कंपनीच्या OFS साठी चांगली मागणी असल्यास सरकारने अतिरिक्त 94,352,094 इक्विटी शेअर्स विकण्याचा ऑप्शन ठेवला आहे.
किती आहे फ्लोवर प्राईस :-
ओएनजीसीच्या (ONGC) इश्यूची फ्लोअर प्राइस 159 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारच्या बंद किंमतीपेक्षा ते 7% स्वस्त आहे. मंगळवारी बीएसईवर BSE ONGCचा शेअर 171.05 रुपयांवर बंद झाला.
सरकारचा वाटा किती ?
ONGC मध्ये सरकारचे 60.41% शेयर्स आहे. ONGC देशातील एकूण ऑइल आणि गॅसपैकी 50% उत्पादन करते.
एकूण ऑफर फॉर सेल (OFS) पैकी किमान 25% म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांसाठी राखीव आहेत. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10% राखीव ठेवण्यात आले आहे.
इश्यूमध्ये 2 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केलेले रिटेल इनव्हेस्टर्स या कॅटेगरीमध्ये येतात.
ONGC ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे कर्मचारी 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या अंतर्गत, OFS मधील 0.075% शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत.