शेतीशिवार टीम, 21 जानेवारी 2022 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi) 10वा हप्ता 10.57 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. परंतु दोन कोटी शेतकऱ्यांचा डिसेंबर -मार्चचा हप्ता अजूनही मिळालेला नाहीये. कारण 12.44 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबे PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पीएम किसानचा (PM Kisan) हप्ता आतापर्यंत मिळाला नसेल, तर तुम्ही पीएम किसान टोल फ्री नंबर, हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता. येथून तुम्हाला कळेल की, तुमचा हप्ता का प्रलंबित आहे.

हप्त्याची अनेक कारणे असू शकतात. जसे आधार, खाते नाव आणि बँक खाते क्रमांकातील चूक. असे झाल्यास येत्या ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ताही तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही पीएम किसानच्या (PM Kisan) वेबसाईटला ऑनलाइन भेट देऊन हे दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही न जात घरी – बसल्या या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील…

सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा…
येथे तुम्हाला शीर्षस्थानी लिंक Farmers Corner दिसेल.
तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास, आधार एडिट ची लिंक दिसेल, तिथे तुम्ही क्लिक करा.
यानंतर उघडणाऱ्या पेजवर तुम्ही तुमचा ‘आधार क्रमांक’ दुरुस्त करू शकता.
दुसरीकडे, जर ‘खाते क्रमांक’ चुकीचा प्रविष्ट केला असेल आणि तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकामध्ये कोणताही बदल करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधून चूक सुधारू शकता….

हप्ता न मिळण्यामागचं हे पण असू शकतं कारण…

अनेक राज्यात अपात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेत होते. अशा शेतकऱ्यांवर सरकारने मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे घेतलेल्या आयकर दात्यांकडून सर्वाधिक रक्कम वसूल केली आहे. अशा अनेक शेतकऱ्यांची नावे दहाव्या हप्त्यातून वगळण्यात आली आहेत.

स्टेटस तपासण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो…

सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’चा (Farmers Corner) पर्याय दिसेल.
येथे ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.
नवीन पेजवर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यामधील कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व ट्रांजेक्शन ची माहिती मिळेल.

तरीही हप्ता नाही मिळाला तर मंत्रालयात याप्रमाणे साधा संपर्क

याप्रमाणे मंत्रालयाशी संपर्क साधा :-

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109
ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *