शेतीशिवार टीम, 21 जानेवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : जगातील असा कोणता देश आहे, तिथे फक्त लग्नाच्या दिवशीच स्त्रियांना आंघोळ करण्याची परवानगी आहे ?
उत्तर: आफ्रिका (Africa) , कुनैन प्रांतात (Qunein Province) राहणाऱ्या “हिंबा” जमातीच्या (Himba tribe) महिलांना आयुष्यात एकदाच स्नान करण्याची परवानगी आहे. तेही त्यांच्या लग्नाच्या दिवशीच. येथे राहणाऱ्या महिलांना पाण्याने हात धुण्याचीही परवानगी नाही…
प्रश्न : सर्वाधिक हिरे (Diamonds) असलेली अंगठी कोणी आणि कुठे तयार केली ?
उत्तर : हैदराबादच्या ज्वेलर्सने 7 हजारांहून अधिक हिरे जडवून अशी अंगठी बनवून एक आदर्श ठेवला आहे. या अंगठीचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेलं आहे. हिऱ्यांनी जडलेली प्रत्येक अंगठी खास असते, पण या अंगठीची खासियत म्हणजे त्यात हजारो हिरे आहेत. या अंगठीत एकूण 7,801 हिरे बसवण्यात आले असून, हा एक जागतिक विक्रम ठरला आहे.
प्रश्न : उपग्रह बनवण्यात आणि लॉन्च करण्यात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर : अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान, चीन या सहा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. ज्यामध्ये आपल्या भूमीवर उपग्रह तयार करून तो प्रक्षेपित लॉन्चकरण्याची क्षमता आहे.
प्रश्न : एका दिवसासाठी पंतप्रधान कोणाला करण्यात आलं होतं ?
उत्तर : फिनलँडमध्ये (Finland), फक्त 16 वर्षांच्या मुलीला “अवा मुर्तो” (Ava Murto) एका दिवसासाठी पंतप्रधान करण्यात आलं होतं. तिने अनेक मानवाधिकार मोहिमा चालवल्या होत्या.स्त्री-पुरुष समानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिने एका दिवसासाठी फिनलँडचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
प्रश्न : जगातील असा कोणता देश आहे, त्या देशात सैन्य नाही ?
उत्तर : ‘आईसलँड’ (Iceland) हा असा देश आहे, जिथे एकही सैन्य नाही. तरीही हा जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक आहे.
प्रश्न : असा कोणता शब्द आहे, जो सरळ लिहिल्यावर मुलीचं नाव येतं अन् उलटं लिहिल्यावर चित्रपटाचं नावं येतं ?
उत्तर : मधु आणि धूम. मधू हे मुलीचं नाव आहे. आणि ते उलट केल्यानंतर ‘धूम’ हे चित्रपटाचे नाव येतं.
प्रश्न : 188.83 टन वजनाचं जड विमान शरीराला बांधून ओढणार्या व्यक्तीचं नाव काय आहे ?
उत्तर : 17 सप्टेंबर 2009 रोजी कॅनडात राहणारे ‘केविन फास्ट’ (Kevin Fast) या व्यक्तीने 188.83 टन वजनाचे जड विमान आपल्या शरीराला 28 फूट 10.46 इंच बांधून खेचले. त्याच्या या विक्रमाची अधिकृत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद केली आहे.
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे, जो दूध आणि अंडी दोन्ही देऊ शकतो ?
उत्तर : “प्लॅटिपिस” (Platypis) हा ऑस्ट्रेलियात आढळणारा प्राणी आहे, जो दूध आणि अंडी दोन्ही प्रथिने युक्त अन्न देतो.
प्रश्न : असं काय आहे, जे सर्वत्र फिरते. पण, मंदिरात जायला घाबरते ?
उत्तर : चप्पल (पादत्राणे)
प्रश्न : भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
उत्तर : श्रीनगर ते कन्याकुमारीला जोडणारा 3745 किमी लांबीचा NH-44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे.