शेतीशिवार टीम, 21 जानेवारी 2022 : गेल्या 4 दिवसात सेन्सेक्समध्ये 1844 अंकांची घसरण झाली आहे. त्यात आज दुपारपर्यंतच्या घसरणीत आणखी भर पडली पडली असून सुमारे 2300 अंकांनी घसरला आहे. असे असूनही, बीएसई (BSE) वर या 10 शेयर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहे.
नवं कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या 15 सत्रांमध्ये बीएसईच्या (BSE) वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, हे 10 शेयर्स 210 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. या यादीमध्ये अनेक मायक्रोकॅप शेयर्सचा समावेश आहे. एनबीएफसी प्लेयर (NBFC Player) KIFS फायनान्शिअल सर्व्हिसेस (KIFS Financial Services) या वर्षी आतापर्यंत 207% रिटर्न्ससह यादीत अव्वल स्थानावर आहे. शुक्रवार, 21 जानेवारी रोजी, हे स्टॉक 31 डिसेंबरच्या 43.5 रुपयांवरून 133.4 रुपयांवर पोहोचला.
त्यानंतर AK Spintex (एके स्पिंटेक्स) चा क्रमांक लागतो, जो या कॅलेंडर वर्ष 2021 च्या शेवटच्या दिवशी 27.95 रुपयांवरून 205 टक्क्यांनी वाढून 84.9 रुपये झाला आहे. याच कालावधीत RTCL (166%), दौलत सिक्युरिटीज (daulat securities) (162%) आणि सॅशे मेटल्स (Sachey Metals) (154%) या शेयर्सनी यादीत 150 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.
Tranway Technologies, Triveni Glass, Orosil Smith, Kelton Tech, BCL Enterprises, Ratonsha International Rectifier, Tinna Rubber & Infra, Shanti Educational आणि Rashi energy या शेयर्समध्ये 100-145 % वाढले आहेत.
मार्केट किंग डॉली खन्ना यांनी डिसेंबर तिमाहीत टिन्ना रबर (Tinna Rubber) आणि इन्फ्रा (Infra) त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस कंपनीत त्यांचे 142,739 शेअर्स व 1.7 % शेअर्स होते.
याशिवाय आणखी 12 कंपन्यांनी यावर्षी आतापर्यंत 95 ते 100 % रिटर्न्स दिले आहेत. यामध्ये भक्ती जेम्स (Bhakti James), बनास फायनान्स (Banas Finance), सिटीझन इन्फोलाइन (Citizen Infoline), गुजरात क्रेडिट कॉर्प (Gujarat Credit Corp), कटारे स्पिनिंग मिल्स (Katare Spinning Mills), स्विस मिलिटरी कन्झ्युमर गुड्स (Swiss Military Consumer Goods) आणि टायने अॅग्रो (Tyne Agro) यांचा समावेश आहे.