Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan Yojana : नव्या वर्षात ‘या’ दिवशी शेतकऱ्यांना 2,000 चं गिफ्ट, पण ‘हे’ शेतकरी 13 व्या हप्त्यास मुकणार..

0

देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे गिफ्ट मिळणार आहे. ताज्या अपडेटनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपयांची रक्कम खात्यावर जमा केली जाणार आहे.

गेल्या वर्षी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पीएम मोदींनी 9 वा हप्ता जारी केला होता. अशा परिस्थितीत सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याचे पैसे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाऊ शकतात. ही रक्कम DBT च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले असून ते 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे.

वार्षिक 6 हजार रुपये मिळतं आर्थिक सहाय्य..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत होत आहे. असे असले तरी, जिल्ह्यातील सुमारे 70 हजार 645 लाभार्थ्यांनी अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे अशा लाभार्थ्यांना त्यांचा पुढील हप्ता बँक खात्यामध्ये जमा होण्यात अडचणी निर्माण होणार आहे.

जालना जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 69 हजार 791 पात्र लाभार्थ्यांनी आपली ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरूवात देखील झाली आहे. या योजनेच्या पुढील लाभाचे हप्ते सुरळीतपणे मिळावे असे वाटत असेल तर त्यासाठी E-KYC ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वेबसाईटवरून किंवा पी.एम. किसान अँपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतः E-KYC प्रमाणीकरण मोफत करता येऊ शकते. जालना जिल्ह्यात एकूण 3 लाख 70 हजार 351 लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यापैकी 70% म्हणजे 2 लाख 69 हजार 791 लाभार्थ्यांनी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

त्यामुळे अजूनही 70 हजार 645 लाभार्थ्यांची ईकेवायसीची प्रक्रिया अपूर्ण असून त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा अशा लाभार्थ्यांना अनुदानापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने देखील करता येते. यासाठी लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावर (CSC) जाऊन ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी शासनामार्फत प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर 15 रूपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

ई-केवायसी करण्यासाठी बँक खात्याला आधार लिंक असणे देखील तितकेच आवश्यक आहे. कारण त्याशिवाय ईकेवायसी प्रक्रिया देखील पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.