शेतीशिवार टीम, 7 एप्रिल 2022 :- पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या सुमारे 12 कोटी लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं असून, या योजनेअंतर्गत एप्रिल-जुलैचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेचा हा 11वा हप्ता असणार आहे. मागील रेकॉर्ड पाहिल्यास, गेल्या वर्षी एप्रिल-जुलैचा हप्ता 15 मे रोजी आला होता. पण, यंदा तो याच महिन्यात येण्याची शक्यता आहे.
या दिवशी येणार 11 वा हप्ता…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पीएम किसानचा (PM Kisan) हप्ता रामनवमी किंवा आंबेडकर जयंतीनिमित्त खात्यात जमा होऊ शकतो.
परंतु त्याआधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे. जर तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर तुमच्या हप्त्यात अडथळा येऊ शकतो. सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा देत ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता ही प्रक्रिया 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करता येईल. यापूर्वी अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती.
12.53 कोटी शेतकऱ्यांनी केली नोंदणी….
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 12.53 कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. परंतु आता सरकारने पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. त्याची पूर्तता केल्याशिवाय योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळणार नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 10 हप्ते वितरित केले आहेत. सरकारने दिलेला 2000 रुपयांचा हप्ता लांबू नये असे तुम्हालाही वाटत असेल, तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि आजच ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करा…
दरवर्षी खात्यात जमा होतात 6000 रुपये…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, मोदी सरकार दरवर्षी 6,000 थेट देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. हे पैसे सरकारी शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिले जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात एवढी मोठी रक्कम वर्ग केली आहे. आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यात आले आहेत.
या तारखांना पाठवले जातात हप्ते…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची रक्कम 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान पहिल्या हप्त्याचे पैसे दिले जातात. दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान मिळतात. तर, योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 11 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करता येणार आहेत.
E-KYC प्रकिया ऑनलाईन कशी पूर्ण कराल ?
सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आता किसान कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
त्यानंतर येथे विचारलेली आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
यानंतर सबमिट वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण होईल…
याप्रमाणे तपासा तुमचं स्टेटस…
सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
आता ‘फार्मर्स कॉर्नर’ (Farmers Corner) या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर लाभार्थी स्थितीवर (Beneficiary Status) क्लिक करा.
आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.
त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.
शेतकरी या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे डिटेल्स पाहू शकता.
टीप : PM KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. कृपया. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा OTP प्रमाणीकरणाद्वारे आधार आधारित eKYC तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. सर्व PM KISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
बायोमेट्रिक eKYC करून घेण्यासाठी किती शुल्क आकारलं जाईल…
आतापर्यंत ई-केवायसी eKYC आधार क्रमांकावर आधारित होते. यासाठी तुमच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) यायचा. आणि तो ओटीपी टाकून ई-केवायसीची (eKYC) प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र आता ही प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली आहे, आता तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी (eKYC) करावे लागेल, त्यासाठी तुम्हाला सीएचसी केंद्रावर जावे लागेल. येथे तुम्हाला ई-केवायसीसाठी 15 ते 30 रुपये शुल्क भरावे लागेल…