Take a fresh look at your lifestyle.

TATA ची New Nexon EV 2022 होणार ‘या’ दिवशी लॉंच ; 400 KM पर्यंत मिळणार रेंज…

0

शेतीशिवार टीम, 7 एप्रिल 2022 :- टाटा मोटर्स बऱ्याच दिवसांपासून Tata Nexon EV ची भारतीय रस्त्यावर टेस्टिंग करत आहे आणि आता या इलेक्ट्रिक SUV ची लॉन्च तारीख देखील समोर आली आहे. Tata Motors ने 6 एप्रिलला सर्व नवीन Curvv EV वरून पडदा काढून टाकला आहे आणि आता, 20 एप्रिल 2022 रोजी TATA आपली नवीन Naxon EV लाँच करणार आहे.

कारचे टेस्टिंग मॉडेल नुकतेच दिसलं गेले आहे, यामध्ये एसयूव्ही (SUV) नवीन अलॉय व्हील आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेकसह दिसली आहे. यापूर्वी, दिल्ली आरटीओच्या (RTO) रिपोर्टनुसार असं समजलं आहे की, नवीन EV ला 136PS इलेक्ट्रिक मोटर मिळू शकते, जी पूर्वीपेक्षा 7PS अधिक पॉवरफुल आहे.

Naxon EV ला आता 40KWh बॅटरी पॅक…

अनेक रिपोर्ट्समध्ये असं उघड झालं आहे की, Nexon EV ला आता 40KWh बॅटरी पॅक मिळू शकतो, जो सध्याच्या पॅकपेक्षा 10KWh जास्त असणार आहे. अलीकडे, ही कार पुण्यात टेस्टिंग करताना दिसून आली आहे आणि हे टेस्ट मॉडेल ड्युअल-बीम एलईडी हेडलॅम्प आणि त्याच्याशी संबंधित एलईडी डीआरएलसह दिसून आली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक एसयूव्हीला (Nexon EV) नवीन लुक देण्यासाठी, कंपनीने त्यात 16-इंच ड्युअल-टोन डायमंड-कट अलॉय व्हील लावले आहेत. या ईव्हीला (EV) आधीच देशातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि नवीन मॉडेलही ग्राहकांच्या पसंतीत उतरणार असून या ईव्हीची (EV) मोठ्या प्रमाणावर विक्री होईल, असा कंपनीला विश्वास आहे.

Naxon EV सोबत मिळणार ऑटो हेडलॅम्प…

अपडेटेड मॉडेलमध्ये इंटेरियर हे आधीच्या मॉडेलसारखेच फीचर्स मिळू शकतात. स्पर्धा लक्षात घेऊन कंपनी त्यात काही एक्स्ट्रा फीचर्स देऊ शकतात.ऑटो हेडलॅम्प, ऑटो क्लायमेट कंट्रोल, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर अनेक फीचर्स Nexon EV मध्ये मिळू शकतात.

सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर, नवीन मॉडेलमध्ये EBD, ISOFIX, फ्रंटमध्ये दोन एअरबॅग, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्ससह ABS मिळणार आहे. ताज्या माहितीनुसार, अधिक रेंज असलेली Tata Nexon च्या पुढील सीटवर व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि पार्क मोडसह येणार आहे.

कारची रेंज 312 असल्याचा दावा..

सध्याच्या Tata Nexon EV सह, कंपनीने 30.2 kWh-R लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे जो पर्मनंट सिंक्रोनस मॅग्नेट सह येतो. कारची रेंज 312 असल्याचा दावा ARAI ने केला आहे, जरी ती रस्त्यावर पूर्ण चार्ज केल्यावर 300 किमी पर्यंत चालवता येते. ही पॉवरट्रेन 125 Bhp पॉवर आणि 245 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या नव्या Naxon EV ची किंमत 17 ते 20 लाखांच्या दरम्यान असू शकते

या इलेक्ट्रिक मोटरसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. आगामी Nexon EV चे टेक्निकल डिटेल्स अद्याप समोर आलेले नाहीत, येत्या काही दिवसांत आपण या बद्दल अधिक जाणून घेउया.

Leave A Reply

Your email address will not be published.