शेतीशिवार टीम, 7 एप्रिल 2022 :- शतावरी प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर आहे. यामध्ये प्रोटीन, एनर्जी, कार्बोहायड्रेट, शुगर, मॅग्नेशियम, कॅल्शियम,लोह आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात प्रभावी आहेत. शतावरीचे सेवन पुरुषांसाठी फायदेशीर ठरतं. लठ्ठपणा,लो स्पर्म काउंट, प्रजनन क्षमता अशा अनेक प्रकारच्या वैवाहिक जीवनातील समस्या शतावरीच्या सेवनाने सुधारल्या जाऊ शकतात. आज आपण या लेखात पुरुषांसाठी शतावरीचे आश्चर्यकारक फायदे आणि त्याच्या सेवनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…
पुरुषांसाठी शतावरीचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. याचे सेवन केल्याने स्पर्म काउंट वाढवण्यापासून ते स्वप्नदोष सारख्या समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया पुरुषांसाठी शतावरीचे फायदे –
1. शारीरिक कार्यक्षमता वाढते :-
शतावरीच्या सेवनाने पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवता येते. याचा त्यांच्या लैंगिक जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत शतावरीचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात. जे शारीरिक दुर्बलता दूर करण्यात प्रभावी ठरतं. अशा परिस्थितीत तुम्ही शतावरी आणि दुधाचे नियमित सेवन करू शकता…
2. स्वप्नदोष पासून मुक्त व्हाल :-
पुरुषांमध्ये स्वप्नदोष होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शतावरी फायदेशीर ठरू शकते. यासाठी शतावरीचे चूर्ण घ्यावे. त्यात थोडी साखर मिसळून दुधासोबत याचे सेवन केल्यास तरुणांना फायदा होऊन स्वप्नदोषाच्या त्रासातून मुक्त व्हाल. याशिवाय तुमच्या इतरही अनेक समस्या यातून सुटतील…
3. वृद्धत्वापासून राहाल दूर :-
शतावरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि ग्लूटाथिओन नावाचे घटक असतात, जे तुम्हाला वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करते. याचे नियमित सेवन पुरुषांमधील सुरकुत्या आणि शारीरिक कमकुवतपणाची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. याशिवाय ते सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही संरक्षण करते.
4. स्पर्म काउंट वाढवण्यासाठी फायदेशीर :-
शुक्राणूंची संख्या कमी असण्याच्या समस्येने त्रस्त पुरुषांसाठीही शतावरी फायदेशीर ठरू शकते. तसेच, ते वंध्यत्वाची समस्या (इनफर्टिलिटी) दूर करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी शतावरीचे नियमित सेवन केल्याने लैंगिक शक्ती वाढते. परंतु, जर तुमच्या शुक्राणूंची संख्या खूपच कमी असेल तर एकदा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
5. कँसर पासून स्वतःचा बचाव होतो :-
शतावरीचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरसारखे घातक आजार बरे होतात. यामध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत, जे शरीरातील कँसरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.
7. दारूचे व्यसन सोडवण्यास मदत करतं :-
शतावरीच्या सेवनाने हँगओव्हरच्या समस्येवरही मात करता येते. शतावरीमध्ये अमिनो अँसिड आढळते, ज्यामुळे दारूचे व्यसन कमी करण्यास मदत होते. गांजाचे सेवन केल्याने आरोग्यात होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी हे विशेषतः फायदेशीर ठरतं. तसेच, हृदयाशी संबंधित समस्या दूर करू शकतात.
8. लठ्ठपणा कमी करण्यास फायदेशीर :-
शतावरीच्या नियमित सेवनाने लठ्ठपणाच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते. शतावरीमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर आढळते, जे शरीरातील चरबी कमी करण्यात प्रभावी आहे. लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या पुरुषांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
शतावरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांवर मात करता येते. मात्र, शतावरीचे जास्त सेवन करू नये हे लक्षात ठेवा. यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. जर तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर तज्ञांच्या सल्ल्यानेच कोणतीही आयुर्वेदिक औषधी वनस्पती घ्या. जेणेकरून पुढील दुष्परिणाम टाळता येतील…
जर तुम्हाला लैगिक क्षमता वाढवायची असेल तर शतावर चूर्णाचे रोज झोपताना 1 ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा शतावरी चूर्णाचे रोज सेवन करावे.यामुळे तुमच्या शरीरात ताकद येईल आणि शरीराचा स्टॅमिना वाढवण्याचे काम होईल. काही दिवसांनी याचे सेवन केल्याने शीघ्रपतन आणि पुरूष कमजोरीची समस्या दूर झाल्याची तुम्हाला अनुभूती येईल…
शतावरीचे सेवन कसे करावे ?
रात्री झोपण्याच्या दीड तास आधी तुम्ही याचे सेवन करू शकता. गरम दुधात हळद मिसळून शतावरी पावडरही पिऊ शकता. याशिवाय दुधात गावरान तूप मिसळूनही याचे सेवन करू शकता…