शेतीशिवार टीम, 7 एप्रिल 2022 :- दिल्लीच्या आधी असं कोणतं शहर आहे जे देशाची राजधानी बनलं होतं ? किंवा असं कोणतं शहर आहे जे एका दिवसासाठी देशाची राजधानी बनवण्यात आलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे का ? इंटरव्हिव्ह दरम्यान कँडिडेट्सला असेच अनेक प्रश्न विचारले जातात.इंटरव्हिव्ह दरम्यान कँडिडेट्सकडून असे अनेक प्रश्न विचारले जातात, ज्यांची उत्तरे देणे थोडे कठीण असते. अशा प्रश्नांची उत्तरे कँडिडेट्स देतात, त्यांना नोकरी मिळते. UPSC ची तयारी करणारे उमेदवार लेखी परीक्षेसह इंटरव्हिव्हची तयारी करतात कारण ती खूप कठीण असते. आम्ही अशाच जनरल नॉलेज संबंधित अशाच काही प्रश्नांबद्दल जाणून घेणार आहोत जे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. हे कोणते प्रश्न आहेत ते जाणून घेऊया…
प्रश्न : 80 मधून 8 किती वेळा वजा करता येईल ?
उत्तर : या प्रश्नाचे उत्तर देताना कँडिडेट्स म्हणाला – 80 मधून 8 ला फक्त एकाच वेळेस वजा करता येईल, कारण 80 मधून एकदा 8 वजा केल्यास 72 हे उत्तर येईल. त्यानंतर, जर आपण 8 वजा केले तर आपण 80 मधून वजा करू शकत नाही तर ते 72 मधून वजा करू शकतो.
प्रश्न : जगातील सर्वात महाग रक्त कोणाचं आहे ?
उत्तर : जगातील सर्वात महाग रक्त हे खेकड्याचं आहे, त्याला हॉर्सशू क्रैब (Horseshoe crab) असंही म्हणतात. या खेकड्याचं रक्त निळ्या रंगाचं असून याला आंतराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. आंतराष्ट्रीय बाजारात या निळ्या रंगाच्या रक्ताची किंमत 11 लाख रुपये इतकी आहे. याचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.
प्रश्न : शुद्ध हिंदीत चहाला काय म्हणतात ?
उत्तर : चहाला शुद्ध हिंदीत ‘दूध जल मिश्रित शर्करा युक्त पर्वतीय बूटी’ असं म्हंटल जातं.
प्रश्न : मानवी मूत्रात किती टक्के पाणी असतं ?
उत्तर : साधारणपणे निरोगी माणसाच्या लघवीत 95% पाणी आढळतं आणि इतर सामान्य घटक जसे की सोडियम – 0.4%, अमोनिया – 0.05%, फॉस्फेट – 0.6%, युरिया – 2%, सल्फेट – 0.2%. क्रिएटिन, युरोबिलिनोजेन आणि कास्ट सारखे पदार्थ देखील उपस्थित असतात, परंतु थोड्या प्रमाणात. सामान्य मानवी शरीरात, विद्रव्य पदार्थ मूत्रात उत्सर्जित होतात…
प्रश्न : सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता आहे ?
उत्तर : या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हीही विचार करत असाल. सर्वात उंच उडणारा पक्षी गिधाड आहे.
प्रश्न : नवी दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोठे होती ?
उत्तर : नवी दिल्लीपूर्वी 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकत्ता होती. ती रॉयल कॅपिटल ब्रिटीश भारताची राजधानी म्हणून दिल्लीचा पाया महाराजा जॉर्ज पंचम यांनी 1911 च्या राज्याभिषेक दरबारात घातला अन् त्यानंतर दिल्लीला भारताची राजधानी म्हणून ओळखलं जातं.
प्रश्न : कर्कवृत्त भारतातील किती जिल्ह्यातून जातं?
उत्तर : कर्कवृत्त भारतातील 35 जिल्ह्यांतून जाते. या 35 जिल्ह्यांमध्ये देशातील आठ राज्ये येतात.
प्रश्न : दिवसातून दोनदा गायब होणाऱ्या मंदिराचे नाव काय आहे ?
उत्तर : श्री स्तंभेश्वर मंदिर, हे मंदिर वडोदरा, गुजरात येथे आहे. स्तंभेश्वर महादेव मंदिर समुद्रात वसलेले आहे.
प्रश्न : असं कोणतं शहर आहे, जे शहर केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलं ?
उत्तर : अलाहाबाद असं एक शहर आहे जे एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलं आहे. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद (प्रयागराज) येथील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येण्याची घोषणा करण्यात आली. या काळात त्याला एका दिवसाची राजधानी बनवण्यात आलं आहे.