नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिस ऑफ इंडियाने ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 12828 रिक्त पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2023 असेल, तर अर्जामध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय 12 ते 14 जून 2023 दरम्यान उपलब्ध असेल.

* पात्रतेच्या अटी

उमेदवारांनी भारत सरकार, राज्य सरकार किंवा भारतातील केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळामधून गणित आणि इंग्रजी विषयांसह इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

उमेदवारांना कॉम्प्युटर ज्ञान आणि सायकलिंगचे ज्ञान असावे.

* वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे.

* पगार

ब्रँच पोस्ट मास्तर – 12,000 रुपये ते 29380,रुपये

असिस्टंट बॅच पोस्ट मास्तर 10,000 रुपये ते 24,470 रुपये

* अर्ज भरण्याची फी

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

पण महिला अर्जदार, एससी / एसटी अर्जदार, पीडब्ल्यूडी अर्जदार आणि ट्रान्सवुमेन अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

* निवड प्रक्रिया

सिस्टिम जनरेटेड मेरिट लिस्ट व अर्जदारांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांची निवड केली जाईल. विद्यार्थ्यांनी विविध अधिकृत बोडांच्या 10 वीच्या परीक्षेत मिळवलेले गुण किंवा ग्रेड किंवा पॉइंट्स यांच्या टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

* अर्ज कसा करायचा –

indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

रजिस्टरवर क्लिक करा आणि होम पेजवर लॉग इन डिटेल्स जनरेट करा.

आवश्यक असलेले डिटेल्स टाकून फॉर्म पूर्ण भरा.

त्यानंतर आवश्यक असलेली डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि ऑप्लिकेशन फी भरा,

शेवटी अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील वापरासाठी त्या अर्जाची कॉपी डाउनलोड करा.

Post Office GDS Bharti Notification :- इथे क्लिक करा

Post Office GDS Bharti ऑनलाईन अर्ज लिंक :- इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *