Cotton Rate : शेतकऱ्यांनो थोडे दिवस थांबा ! कापसाचा भाव वाढतोय, ‘या’ तारखेपर्यंत 14 हजारांपारही जाणार..
राज्यात साधारणत: दिवाळीला खासगी क्षेत्रात कापूस खरेदीला सुरुवात होते. यंदा हा मुहूर्त व्यापाऱ्यांना साधता आला नाही केवळ काटयाचे पूजन व्यापाऱ्यांनी केले. सुरूवातीला उशिरा पेरण्या आणि अतिवृष्टीमुळे कापसाला नोव्हेंबरच्या खरेदीचा मुहूर्त झाला.
यंदा उशिरा पेरण्या आणि अतिवृष्टीमुळे कापूस उशिरा निघत आहे. काही भागात कापसाचा पहिला आणि दुसऱ्या वेचण्या झाल्या. पण, जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि ओलाव्यामुळे व्यापारी कापूस खरेदीसाठी फारसे उत्सूक नव्हते. भावदेखील 7 हजार 500 रुपये प्रती क्विटल इतके कायम होते दुसरीकडे सोयाबीनलाही भाव नव्हता. तरीही कापसाची आवक वाढली नाही.
अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी सणाच्या तोंडावर मिळेल त्या भावात कापसाची विक्री केली . दिवाळी झाल्यानंतर वातावरण होऊन कापूस फुटण्यास गती आली ओलावाही कमी झाला. जागतिक बाजारात भाव वाढ लागल्याने बाजारात खुल्या व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी वाढविली.
अवघ्या 10 दिवसांमध्ये 1500 ते 2000 रुपयांनी दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तरीही अनेकांनी तूर्तास कापूसविक्री लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
मार्चमध्ये भाव पोहचणार 14 हजारांवर..?
दरम्यान , सरासरी उत्पादन निम्म्यावर आल्याने मागच्या हंगामात कापसाला मार्च महिन्यात 14 हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला होता. यंदाच्या हंगामाच्या सुरूवातीला सप्टेंबरमध्ये कापूस खरेदीच्या मुहूर्ताला 14-15 हजारांदरम्यान दर मिळाल्याने शेतकऱ्यांना हा दर कायम राहणार अशी आशा वाढली होती.
यातच अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. दसरा, दिवाळीदरम्यान काही भागात धुके पसरल्याने पाटी करपल्याने बाजारावर परिणाम होणार हे निश्चित होते. परंतु, दर कमीच राहीला. आता कुठे हळू हळू दर वाढत असल्याने आशा अधिक वाढल्या आहेत.
मागील दहा दिवसांपासून कापसाच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. राज्यातील विविध आठवडी बाजारासह इतर दिवशी 9200 ते 9300 रुपये प्रती क्विटलवर दर पोहचले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला कापूस आता बाजारात विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येते. तर आणखी दर वाढणार या आशेने अनेकांनी तूर्तास कापूसविक्री थांबविल्याने बाजारातील आवक मंदावली आहे.
जाणकारांनी व्यक्त केला अंदाज..
हंगाम संपल्यानंतर साधारणपणे मार्च अखेरपर्यंत हा भाव 14 हजारापर्यंत जाण्याची शक्यताही जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसेच ऑस्टेलियाकडून 51,000 टन कापसाची आयात होणार ? या अफवेमुळे शेतकरी घाबरले अन् मार्केटमध्ये अवाक वाढली, परंतु शेतकरी मित्रांनो अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्यांना घाबरून न जाता आपला कापूस जसा शक्य होईल तसा मार्केटमध्ये विका आणि चांगल्या भावाने कापूस विका कुठल्याही अफवेला बळी पडू नका.