Take a fresh look at your lifestyle.

शिर्डी ते मुंबई समृद्धी महामार्ग : 7.78Km च्या बोगद्यासाठी 2745 कोटींचा खर्च, बोगदाही झाला तयार, पहा फक्त 2 तासांत गाठता येणार मुंबई..

0

मुंबई – नागपूर एक्सप्रेस – वेच्या 520 किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालं असून 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केलं होतं. पहिला टप्पा नागपूर ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्राला जोडला गेला आहे. या महामार्गावर प्रवासही सुरु झाला असून पूर्वी जी अवजड वाहने नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आणि खासगी गाड्या चालत होत्या, त्याचे प्रमाणही नगण्य झालं आहे.

ही वाहने सरळ समृद्धी महामार्गवरून जात आहे. तसेच हौशी प्रवाशांना हा महामार्ग खुणावत असल्याने नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कमी होत आहे. या महामार्गावर सुरुवातीपासूनच वाहतुकीचा ओघ दिसून येत आहे.

एकीकडे समृद्धी महामार्ग झाल्यावर त्यावरून वाहतुकीचा ओघ कसा असेल याबद्दल कित्येकांच्या मनात शंका कुशंका होती. मात्र अवघ्या वीस दिवसांतच समृद्धी महामार्गाने आपला रंग दाखवला आणि समृद्धी महामार्गाच्या समांतर असणाऱ्या नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग 573 C असून यावरून नागपूर शिर्डीसाठी लागणारा वेळ अधिक होता तसेच रस्त्यावरील खड्डे, मध्ये येणारी गावे, त्यात होणारी वाहतूक कोंडी याचा सर्वात जास्त त्रास हा लहान चारचाकी वाहनांसोबतच मोठ्या वाहनांना तसेच अवजड वाहतूक करणाऱ्यांना होत होता. त्यामुळे आता हा महामार्ग गेमचेंजर तर ठरला परंतु आता शिर्डी ते मुंबई हा 200Km चा दुसरा टप्पा कधी सुरु होणार ? याबाबत प्रवाशांना उत्सुकता लागली आहे. हा दुसरा टप्पा सूर झाल्यास शिर्डी ते मुंबई हे अंतर फक्त दोन ते अडीच तासांत पूर्ण होणार आहे.

सध्या या दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून या महामार्गावर येणारा राज्यातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या बोगद्याचे काम पूर्ण झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील कसारा यांना जोडणारा 7.78Km लांबीचा तर 18 मीटर रुंदीचा समृध्दी महामार्गावरील हा सर्वात मोठा बोगदा आहे.

MSRDC ने बोगद्यासाठी घेतले खूप कष्ट..

या बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल 2745 कोटींचा खर्च झाला असून या दोन बोगद्यांना जोडण्यासाठी 26 क्रॉस पॅसेज आहेत, जे कोणत्याही इमर्जन्सी परिस्थितीत वापरले जाऊ शकतात. प्रॉपर एयर सर्कुलेशनसाठी प्रत्येक बोगद्यात 54 मोठे पंखे बसवले आहेत. संपूर्ण बोगद्याला अग्निसुरक्षा प्रणाली दिली जात आहे. भिंती आणि बोगद्याचा वरचा भाग एका सूक्ष्म पदार्थाने लेप केला जात आहे. ज्यामुळे सुमारे दोन तास खडक वितळणे टाळता येईल. तसेच बोगद्यामध्ये वॉटर मिस्ट सिस्टम असेल जी आग लागल्यास सक्रिय केली जाईल.

हा बोगदा इतका सुसज्ज आहे की, बोगद्यातही 100 ते 120 प्रतितास इतक्या वेगाने वाहने शकतात. हा बोगदा 2 पार्ट मध्ये विभागलेला असून प्रत्येकात 3 लेन असल्यामुळे बोगद्यातील प्रवासाचा वेळ 7-8 मिनिटांवर येणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी येथील बांधकाम प्रकल्पातील हा बोगदा सर्वात कठीण होता, कारण बोगदा डोंगर रांगेतून कापायचा होता. या बोगद्यासाठी तब्बल अडीच हजार कुशल, अकुशल कामगार आणि कर्मचारी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेत. यामध्ये उजव्या बाजूचा बोगदा 7.74 Km आणि डाव्या बाजूचा बोगदा 7.78 Km लांबीचा आहे.

कधी सुरु होणार शिर्डी ते मुंबईचा प्रवास..

शिर्डी ते मुंबईपर्यंतचा टप्पाही येत्या डिसेंबरमध्ये वाहतूकीसाठी खुला हाण्याचे संकेत मिळाले आहे. हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबई – नागपुर प्रवासासाठी लागणारा 15 ते 16 तासांचा कालावधी जवळ जवळ निम्म्याने कमी होऊन, 7 ते 8 तासांवर येणार आहे. येत्या डिसेंबर 2023 हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

इगतपुरी ते कसारा बोगद्याची वैशिष्ट्ये :-

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग पॅकेज 14 मध्ये हा ब्रॉड ट्विन बोगदा समाविष्ट आहे, ज्याचे अंतर 7.78Kms असून महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि रुंद आहे. चेनानी – नाश्री रोड आणि अटल बोगदा, नंतरचा हा भारतातील तिसरा सर्वात लांब बोगदा आहे. यानंतर 13Kms लांबीचा नव्याने होणार पुणे – मुंबई मिससिंग लिंक हा प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहे.

मुख्य बोगदा: 7.78 Km
रुंदी : 17.6 मी
उंची : 9.12 मी
LHS ट्यूबची लांबी : 7.780 Km
RHS ट्यूबची लांबी: 7.74 Km

कट आणि कव्हर बोगदा: 0.24 Km
सावली बोगदा: 0.2 Km

बोगद्याच्या संरचनेची एकूण लांबी: 8.22 Km

क्रॉस पॅसेज / बोगदे : 26 (प्रत्येक 44.16 मीटर लांब)
लेनची संख्या: 3 (प्रत्येक 3.75 मीटर रुंद 3 मीटर पक्क्या खांद्यासह)
अंतर : प्रत्येक 300 मी
लांबी: 45 मी
पूर्ण रुंदी: 7.65 मी
पूर्ण उंची: 6.6 मी

ले-बाय: 10 (LHS आणि RHS मध्ये)
अंतर: प्रत्येक 750 मी

अनुलंब शाफ्ट: 7 मी व्यास

खोली : 70 मी

कलते शाफ्ट

लांबी: 504 मी
पूर्ण रुंदी: 9 मी
पूर्ण उंची: 8.5 मी

Leave A Reply

Your email address will not be published.