5-स्टार सेफ्टी रेटिंग, किंमतही 6 लाखांच्या आत, पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये एंट्री, ‘या’ SUV ने ग्राहकांना अक्षरशः वेड लावलं !
दरवर्षी भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार्सची यादी प्रसिद्ध केली जाते. बहुतांशवेळा या यादीत फारसा फरक झाल्याचे दिसून येत नाही. मात्र यावेळेस या यादीत एका नव्या कारने एंट्री मारली आहे. विशेष म्हणजे ही कार टाटाची असून ग्राहकांमध्ये या कारच्या बाबतीत भलतीच क्रेझ असल्याचे दिसून येत आहे.
तर ती कार म्हणजे Tata Punch. 2022 च्या कॅलेंडर वर्षामध्ये या 1,29,895 युनिट्सची विक्री करत दिमाखदारपणे टॉप-10 बेस्ट सेलिंग कार्सच्या यादीत प्रवेश केला. हा गौरव मिळवतानाच Tata Punch भारतातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी प्रवासी कार बनली आहे. टाटा मोटर्सने पंच मायक्रो SUV 2021 च्या उत्तरार्धात लाँच केली होती आणि ही कार लाँच झाल्यापासून तीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकाच झुंबड उडाली आहे.
या 5-सीटर SUV ची (एक्स-शोरूम) किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.53 लाख रुपये पर्यंत जाते. या कारची प्योर, एडवेंचर, कम्प्लिश्ड आणि क्रिएटिव्ह अशा 4 व्हेरियंटमध्ये विक्री केली जाते. पंचने कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये देशांतर्गत तब्बल 1,29,895 युनिट्सची विक्री केली आहे.
काय आहे पंचची खासियत..
सब – 4 मीटर पंच SUV ही देशातील दहावी सर्वाधिक विक्री होणारी प्रवासी कार ठरली आहे, तर देशातील चौथी सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. पंच ही GNCAP 5 सीटर सेफ्टी रेटिंगसह उपलब्ध असलेल्या व्हॉल्यूम स्पेसमध्ये खरेदी करता येऊ शकणार्या सर्वात सुरक्षित कारपैकी एक मनाली जाते. या कराची सेफ्टी सिस्टीम ALFA (Agile Light Flexible Advanced) प्लॅटफॉर्मबेस्ड आहे शिवाय ही कार 366 लीटरच्या बूट स्पेस क्षमतेसह 187mm ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळवते.
टाटा पंचमध्ये अप्रोच एंगल 20.3 डिग्री, डिपार्चर एंगल 37.6 डिग्री और रॅप – ओवर एंगल 22.2 डिग्री आहे. या कारने नेक्सॉन सोबत गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईस्थित टाटा कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूमचे योगदान दिलं आहे. या कार मध्ये देखील टॅगो, टिगॊर, अल्ट्रोजमध्ये असणारे 1.2-लिटर 3-सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

अशी आहे पंचची पॉवरट्रेन :-
पंचच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, ही कार 86hp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारची 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टीम फाइव्ह-स्पीड AMT शी जोडलेली आहे. ऑफ-रोडिंगसाठी, या कारमध्ये AMT ट्रिममध्ये ट्रॅक्शन प्रो मोडसह एन आयडल स्टार्ट / स्टॉप टेक्नॉलॉजी मिळते.
टाटा पंचला भारतात अद्याप कोणताही थेट प्रतिस्पर्धी नाही. मात्र या वर्षाच्या शेवटी, Hyundai मायक्रो SUV सेगमेंटमध्ये टाटा पंचशी स्पर्धा करण्यासाठी एक छोटी SUV लाँच करणार आहे. लवकरच पंचचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट देखील लॉन्च केलं जाऊ शकतं अशी चर्चा सध्या सुरु आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन जागतिक स्तरावर पदार्पण करू शकतं.

टाटा पंचचे फीचर्स :-
सध्याची टाटा पंच ICE प्रोजेक्टर हेडलाइट्स, 16 – इंच अलॉय व्हील, 7-इंच TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एक कोल्ड ग्लोव्हबॉक्स, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, ब्रेक स्वे, इलेक्ट्रॉनिक क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इंजिन स्टार्ट / स्टॉप बटण, 90-डिग्री ओपनिंग डोअर अनेक उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. यामुळे बाजारात या मिनी SUV ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.