पुणे जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 445 शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाइन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 14 लाख 21 हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी 13 लाख 64 हजार रुपये इतकी रक्कम अदा केली आहे.

पुणे जिल्ह्यात मार्च 2023 मधील अतिवृष्टीमुळे एकूण 84 गावातील 1 हजार 434 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे एकूण 408.94 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतीपिके व फळपिकांच्या नुकसानीपोटी 70 लाख 70 हजार रुपये अनुदान मागणी केली आहे, असेही कळविले आहे.

सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 मध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित गावे, शेतकरी, बाधित क्षेत्र व नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे :-

भोर : बाधित गावे 78 , शेतकरी 523 , बाधित क्षेत्र 165.66 हेक्टर, नुकसान भरपाई – 23 लाख 10 हजार.

वेल्हा : बाधित गावे 2 , शेतकरी 11 , क्षेत्र 1.21 हेक्टर, नुकसान भरपाई- 39 हजार रुपये.

मावळ : बाधित गावे 7 , शेतकरी 114, क्षेत्र 24 हेक्टर, नुकसान भरपाई – 3 लाख 26 हजार रुपये.

हवेली : बाधित गावे 104, शेतकरी 7 हजार 490, क्षेत्र 3146.19 हेक्टर, नुकसान भरपाई – 8 कोटी 33 लाख 2 हजार रुपये.

खेड : बाधित गावे 34, शेतकरी 1 हजार 947, क्षेत्र 1081.42 हेक्टर, नुकसान भरपाई – 2 कोटी 2 लाख 23 हजार रुपये.

आंबेगाव : बाधित गावे 89 शेतकरी 9 हजार 779, क्षेत्र 2646.85 हेक्टर, नुकसान भरपाई – ४ कोटी 96 लाख 69 हजार रुपये.

जून्नर : बाधित गाव 176 , शेतकरी 22 हजार 591, क्षेत्र 14 हजार 556.35 हेक्टर, नुकसान भरपाई – 24 कोटी 51 लाख 46 हजार रुपये.

शिरूर : बाधित गावे 67 , शेतकरी 4 हजार 734, क्षेत्र 1 हजार 969.54 हेक्टर. नुकसान भरपाई 4 कोटी 56 लाख 66 हजार रुपये.

पुरंदर : बाधित गावे 146 , शेतकरी 27 हजार 841 , क्षेत्र 9 हजार 332.40 हेक्टर, नुकसान भरपाई – 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपये.

दौंड : बाधित गावे 30 , शेतकरी 2008 , क्षेत्र 818.57 हेक्टर, नुकसान भरपाई – 2 कोटी 14 लाख 80 हजार रुपये.

बारामती : बाधित गावे 101 , शेतकरी 8 हजार 417 , क्षेत्र 3880.28.हेक्टर , नुकसान भरपाई 5 कोटी 52 लाख 20 हजार रुपये अशी एकूण 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम आहे.

pune Atirushti Nuksan Bharpai : 2022 List जिल्ह्याच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होणार आहे, लिंक :- pune.gov.in

nanded June -August 2022

Naigaon
Mukhed Part 2
Mukhed
Nanded
Umri
Kandhar
Loha part 2
Loha part 1
Ardhapur
Mahur Part 2
Mahur Part 1
Deglur Part 2
Deglur Part 1
Dharmabad
Bhokar
Hadgaon part 2
Hadgaon part 1
Biloli Part 1
Biloli Part 2
Himayatnagar Part 2
Himayatnagar Part1
Kinwat part -2
Kinwat part 1
Mudkhed
धाराशिव ( उस्मानाबाद जिल्हा ) 
Download pdf 
Distribution of farmers affected by continuous rain and heavy rains from june 2022 to oct 2022 list of farmers
Distribution of Subsidy to Farmers affected by continous Rain and Heavy Rains from June 2022 to Oct 2022
 
तालुका लोहारा:- माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप(शेतकऱ्यांची यादी)
तालुका तुळजापूर:- माहे जुन ते ऑगस्ट २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप(शेतकऱ्यांची यादी)
तालुका तुळजापूर:- माहे जुन ते ऑगस्ट २०२२ मधील सततच्या (निकषाबाहेरील) पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप(शेतकऱ्यांची यादी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *