Pune – Aurangabad Highway : ‘या’ दिवशी होणार प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा, पुणे-5 तालुक्यात 80Km अंतर, जमीनदारांना असा मिळणार मोबदला..
पुणे – अहमदनगर – औरंगाबाद या नव्या बहुचर्चित महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रीया लवकरच सुरु होणार असून यासाठी तातडीने अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 268 किलोमीटरचा हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे औरंगाबाद हे अंतर केवळ अडीच तासात विनाअडथळा पार करता येणार आहे.
त्यामुळे साहजिकच या महामार्गाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर, हवेली, दौंड, पुरंदर व भोर या 5 तालुक्यातील 44 गावांमधुन 80.5 किलोमीटरचा हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे साहजिकच शिरुर व हवेली तालुक्यातील गावांनाही या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे.
शिरुर तालुक्यातील उरळगांव, सातकरवाडी, दहीवडी, आंबळे, बाभुळसर खुर्द, करडे, गोलेगांव, चव्हाणवाडी यासाठी जमीन गावांमधील अधिग्रहीत केली जाणार आहे, प्रस्तावित रस्त्यापासून 12 किलोमीटरवर पुढे रांजणगांवला हा रस्ता जोडण्याचे नियोजन आहे.
या भूसंपादनात जमीन जाणाऱ्या जमीनदारांना रेडीरेकनरच्या दरापेक्षा जवळपास चौपट मोबदला मिळणार आहे. रांजणगांव औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्र.3 मधील करडे – सरदवाडीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमीनीला जो दर मिळाला आहे. जवळपास तेवढाच दर अधिग्रहणानंतर शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.
भूसंपादनासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुकानिहाय सक्षम भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. शिरुर तालुक्यासाठी शिरुरचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) संतोषकुमार देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अर्थातच यासाठी ज्या अधिकाऱ्यांना या परिसराची माहिती आहे, अशाचं अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे दिसून येत आहे.
पुणे-औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे : Alignment Option-3 नेच होणार महामार्ग, केंद्र शासनाचं राजपञक जारी, जिल्हानिहाय पहा गावांची नावे..
पुणे-औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे – Alignment Option-3 नेच होणार महामार्ग, केंद्र शासनाचं राजपञक जारी, जिल्हानिहाय पहा गावांची नावे..
पुणे जिल्ह्यातून एकुण 80.5 किलोमीटर रस्ता जात असून यासाठी नियुक्त भूसंपादन अधिकारी, रस्ता कोणत्या गटातून, कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून जाणार आहे या बाबत रूट – लाईन अलाइनमेंट आली असून आता लायनिंग चं काम सुरु असून शेतकऱ्यांची नावे निश्चित होणार आहे. त्यानंतर तातडीने त्याची जाहीरात प्रसिध्द केली जाईल.
21 दिवसांच्या कालावधीनंतर मोबदल्याची रक्कम जाहीर करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला गती मिळणार आहे मार्च 2023 पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून जून 2023 प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
पुणे – अहमदनगर – औरंगाबाद हा बहुचर्चित नवा महामार्ग पूर्णपणे ग्रीनफिल्ड महामार्ग आहे. अर्थातच ग्रीनफील्ड म्हणजे कोणत्याही जुन्या रस्त्याचा यात समावेश नसणार आहे. संपूर्ण महामार्ग नवीन उभा करण्यात येणार आहे. हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. या संदर्भातील संपूर्ण प्रकल्प एनएचआयने केला असून केंद्रानेही त्याला तयार आराखडा मंजूरी दिली आहे.
नगर- औ.बाद हद्दीत 20-25Km अंतरात मोठा बदल, पुण्यातही काही ठिकाणी दिशा बदलणार रस्ता…
पहा रोडमॅप
हा महामार्ग सहापदरी असणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला गती मिळणार आहे. मार्च 2023 पर्यंत भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण करून जून 2023 पर्यंत प्रत्यक्ष रस्त्याचे काम औरंगाबाद हे 268 किलोमीटरचे मोठे अंतर केवळ अडीच तासात पूर्ण करता येणार आहे . त्यामुळे मराठवाडा आणि साहजिकच अडथळ्याशिवाय पुणे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा दुवा आणखी गतीमान होणार आहे.