काही ठराविक पिके अशी असतात जी केवळ त्या ठराविक भागात आणि ठराविक वातावरणातच पिकू शकतात. जसे कि सफरचंद आणि केशर या पिकांचे उत्पादन देशात केवळ काश्मीर सारख्या राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. काश्मीरमधील वातावरण या पिकांसाठी पोषक असल्याने हे शक्य होते. केशर हे जगातील सर्वात महागडे मसाल्याचा पदार्थ असल्याचे सर्वज्ञात आहेच. त्यामुळे या पिकाला जगभरातून चांगली मागणी देखील आहे.

मात्र, काश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची पुण्यात देखील शेती केली जात आहे, असे जर तुम्हाला कुणी म्हटले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का ? ही असाध्य वाटणारी किमया सध्या करून दाखवली आहे, पुण्यातील शैलेश मोडक या तरुणाने. शैलेश मूळचा नाशिकचा राहणारा असला तरी गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात स्थायिक झाला आहे.

शैलेशच्या या आगळ्या वेगळ्या शेतीची परिसरामध्ये चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.विशेष म्हणजे शैलेशने ही केशरची शेती चक्क एका कंटेनरमध्ये केली आहे. या शेती पद्धतीला कंटेनर फरमिंग असेही म्हटले जाते. सोन्याप्रमाणेच केशर हे देखील तोळ्यावर विकले जाते. भारतीय अन्न पदार्थात केशरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केशराच्या दर्जानुसार याची प्रतिग्रॅम 300 ते 1500 रुपयांपर्यंत विक्री केली जाते.

केशराच्या दर्जानुसार बाजारात त्याचा भाव ठरवलं जात असतो. हिमाचल प्रदेश, काश्मीर अश्या थंड आणि बर्फाळ प्रदेशात केशरचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मागणीच्या केवळ 3 ते 4 टक्केच उत्पादन भारतात घेणे शक्य आहे. मात्र या सर्व गोष्टींचा विचार करून मोडक यांनी यावर एक भन्नाट शक्कल लढवून हा कंटेनर फार्मिंगचा प्रयोग पुण्यात राबवला असून तो चमत्कारिकरित्या यशस्वी देखील करून दाखवला आहे.

६ वर्षांपासून शैलेश मोडक यांचा प्रयोग..

शैलेश यांनी हे पीक एका कंटेनरमध्ये घेतल्याने त्याचे परिसरात त्याबद्दल मोठे कुतूहल आहे. शैलेश मोडक हे गेल्या सहा वर्षांपासून हा प्रयोग राबवत आहेत. ही शेती यशस्वी करण्यासाठी एअरपोनिक पद्धत वारण्यात आली आहे. शैलेश यांनी 320 वर्गफुटाच्या कंटेनरमध्ये केशरची लागवड करून त्या सोबत इतर भाज्यांचे देखील पीक घेतले आहे. यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती, परदेशी भाज्या, मसाले या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर अखेर शैलेश मोडक यांनी केशर हे पीक घेण्याचे ठरविले.

काश्मीरला जाऊन केला होता अभ्यास

शैलेश यांनी प्राथमिक प्रयोगासाठी काश्मीर मधील पँम्पोरमधून बारा किलो केशरचे कंद मागविले. या कंदाची वाढ उत्तमरीत्या व्हावी या उद्देशाने त्यांनी कंटेनरमध्ये योग्य आणि नियंत्रित तापमान ठेवले. या वातावरणात कंद चांगल्या प्रकारे वाढत असल्याचे पाहून त्यांना हुरूप आला, परत काश्मीरला जाऊन त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. काही दिवस तिथेच राहून केशर पिकाच्या लागवडीचे प्रशिक्षण घेतले. याबाबतचा सर्व अभ्यास झाल्यानंतर शैलेश यांनी कंटेनरमध्ये केशर लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी कंटेनरमध्ये केशरची लागवड लावली.

कुठे केली कंटेनरची उभारणी

कंटेनरमध्ये काश्मीर प्रमाणे तापमान नियंत्रित करण्याकरता एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी, डीह्युमिडिफायर तसेच आद्रता कमी – जास्त करण्याकरता चारकोल वर आधारीत तंत्र अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर या कंटेनरमध्ये तयार करण्यात आला. तसेच फोटोसिंथेसिस प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी रोपांच्या अवस्थेनुसार लाल, पांढरा आणि निळ्या रंगाचा कृत्रिम प्रकाशही याठिकाणी पुरविला जातो. शैलेश यांनी पुण्यातील वारजे परिसरात हा कंटेनर तयार केला आहे. कंटेनरमधील एका ट्रेमध्ये आकारानुसार चारशे ते सहाशे कंद बसवले जातात.

उत्पन्नात लाखोंची हमी

एका कंटेनरमध्ये सुमारे हजार किलो पर्यंत कंदाची वाढ करता येते. त्यापासुन सुमारे दोन ते अडीच किलो केशर मिळण्याची आशा शैलेश यांनी व्यक्त केली आहे. शैलेश यांनी लागवड केलेल्या केशरचा दर प्रति ग्रॅम हा 499 इतका आहे. बाजारभावानुसार याचा दर किलोला 6,23,750 इतका होतो. कंटेनर तयार करण्यापासून ते काश्मीरवरून कंद आणण्यापर्यत शैलेश यांचा 8,00,000 रुपये इतका खर्च आला आहे.

अधुनिक शेती ही काळाची गरज

निसर्गाचा लहरीपणा, वेळोवेळी पडणारे दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्ती बरोबरच शेतकऱ्याला आजच्या काळात आर्थिक स्थितीशी देखील जुळवून घेता आले पाहिजे, त्यासाठी तरुणांनी आधुनिक शेतीचे वेगवेगळे मार्ग अवलंबले पाहिजे जेणेकरून स्पर्धेच्या या युगात शेतकरी देखील टॅग धरून राहिला पाहिजे, असे शैलेश यांनी सांगितले.

केशराचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
दृष्टी वाढवण्यासाठी फायदेशीर
कर्करोगाशी लढण्यास मदत करते
अल्झायमरचा सामना करण्यासाठी उपयुक्त
वजन कमी करण्यात मदत करते
मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम देते
दम्यावर गुणकारी ठरते
सांधेदुखीवर प्रभावी
गर्भधारणेदरम्यान केशरचे सेवन करणे गुणकारी
त्वचेची काळजी घेते केशर
जखमांवर देखील उपयुक्त
डोकेदुखीवर रामबाण उपाय
केस गळणे कमी करते
पोटाचे विकार दूर करण्यासाठी होतो केशराचा फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *