सिंहगड रोडवरील ‘माणिकबाग’ला रहिवाशांची पसंती ! रिंग रोड – मेट्रो – IT पार्कसह उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी; फ्लॅटचे दर 21 लाखांपासून पुढे..
सर्व सुख-सुविधा असलेला माणिक बाग हा आनंद नगर, सिंहगड रोडवरील प्रमुख भाग आहे. शाळा, हॉस्पिटल, मार्केट तसेच प्रमुख रस्ते जवळच असल्यामुळे रहिवाशांना पसंतीचा हा परिसर आहे.
बजेट फ्रेंडली घरांपासून प्रिमियम घरांपर्यंत येथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या भागाला नागरिकांकडून चांगली मागणी आहे. येथून एनएच -48 हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे एक किमी अंतरावर आहे. यामुळे रहिवाशांना सातारा – मुंबई येथे जाण्यासाठी तसेच शहर महामार्ग – शहर येथून चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करते.
पुणे मेट्रो एक्वा मार्गावरील नळ स्टॉप मेट्रो स्टेशन येथून 5 किमी अंतरावर आहे आणि वनाज आणि रामवाडी मेट्रोला जोडते. सिंहगड रस्त्यावर देखील मेट्रो प्रस्तावित आहे. तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी येथे उड्डाणपुलाचे कामही सुरु आहे.
पुणे जंक्शन रेल्वे स्थानक तसेच एसटी बस स्थानक सिंहगड मार्गावरुन सुमारे 10 किमी तर स्वारगेट बस स्थानक हे 7 किमी अंतरावर आहे. सिम्फनी आयटी पार्क माणिकबागपासून 4 किमी अंतरावर असून पांडुरंग इंडस्ट्रियल एरिया हे येथून 3 किमी अंतरावर आहे.
तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ माणिकबागपासून सिंहगड मार्गे सुमारे 18 किमी अंतरावर आहे. चांगले रस्ते कनेक्टिविटी आणि जवळच असलेली रोजगार केंद्रे यामुळे हा भागाला एक पसंतीचे मध्यम उत्पन्न रेंटल ओळखले जाते.
तसेच देवयानी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, शाश्वत हॉस्पिटल आणि माई मंगेशकर हॉस्पिटल हे माणिक भागपासून 5 किमी अंतरावर आहेत. सिटी वर्ल्ड स्कूल, किड – झी स्कूल आदी शाळा, ज्युनियर कॉलेज 3 किमीच्या परिघात आहेत. इझीडे हायपर मार्केट आणि अभिरुची मॉल यासारखे अनेक रिटेल हब 3 किमीच्या परिसरात आहेत.
पुणे – ओकायामा फ्रेंडशिप गार्डन कम्युनिटी पार्क आणि वडगाव जॉगिंग पार्क हे माणिकबागच्या 3 किमी अंतरावर आहेत. अनेक प्रसिध्द हॉटेल्स, चौपाटीही येथून हाकेच्या परिसरात आहे. तसेच खडकवासला, पानशेत धरण सिंहगड किल्ला ही पर्यटनस्थळेही जवळच आहे.
घरांचे दर ( लाख / कोटीमध्ये)
वन बीएचके – 21 लाख ते 50 लाख
टू बीएचके – 40 लाख ते 1 कोटी
थ्री बीएचके – 70 लाख ते 1.30 कोटी
फोर बीएचके – 1 कोटी ते 1.50 कोटी
बंगलो – 2 कोटीपासून पुढे