Take a fresh look at your lifestyle.

Pune Metro: शिवाजीनगर – हिंजवडी 23Km मेट्रोच्या कामाला गती; 8,100 कोटींचा निधी, पहा रूट मॅप अन् स्टेशन्स..

0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून पुणे शहरातील सर्वाधिक लांब मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. वर्षभरामध्ये या मार्गावर 300 खांब उभे करण्यात आले आहेत. तसेच खांबावरील पुलाच्या जोडणीचे काम सुरू झाले आहे. शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचे काम सुसाट असल्याने दोन वर्षांमध्ये हिंजवडीतील आयटी हबमधील कर्मचाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पुणे शहरातील एक महत्त्वपूर्ण भाग आणि आयटी हब म्हणून हिंजवडीची ओळख आहे. या भागामध्ये अनेक आयटी कंपन्या असून लाखो कर्मचारी काम करतात, मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा यामुळे या कर्मचाऱ्यांना कोंडीचा मोठा सामना करावा लागतो परंतु आता वर्षभरात हा मेट्रो प्रवास सुरु होणार आहे.

पुणेरी मेट्रो या टोपणनावाने, या मार्गाला महाराष्ट्राच्या राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2018 रोजी 8,100 कोटी रुपयांच्या बजेटसह डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्स्फर (DBFOT) तत्त्वावर सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलच्या अंमलबजावणीसाठी मंजूरी दिली आहे.

एकाच ठिकाणी येणार तीन मार्ग :-

पुणे मेट्रोचे स्वारगेट ते पिपरी आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग आहेत. त्यांची उभारणी महामेट्रो करत आहे. हे दोन्ही मार्ग शिवाजीनगर येथे एकत्र येतात.

मेट्रोचा तिसरा मार्ग शिवाजीनगर ते हिंजवडी आहे. या प्रकल्पाची उभारणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) आणि टाटा समूहाची स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड ( PICTMRL) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे .

मार्गिका 23.3 किलोमीटरची शिवाजीनगर – हिजवडी मेट्रोचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून सार्वजनिक खासगी भागीदारी ( PPP) तत्त्वावर टाटा समूहाला देण्यात आले आहे.

त्यासाटी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्वतंत्र हेतू उद्देश कंपनीची स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. ही मार्गिका एकूण 23.3 किलोमीटर अंतराची आहे .

12 ठिकाणी मेट्रोचे काम सुरू या मार्गावर सध्या विविध ठिकाणी गर्डरचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या प्रत्येक गर्डरची लांबी सुमारे 70.5 मीटर आहे. या मार्गावर विविध 12 ठिकाणी मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे.

हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा 23 किमीचा हा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प (Elevated Metro Rail Project) आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहर हिजवडी आयटी हबला जोडले जाणार आहे.

सिस्टम स्पेसिफिकेशन :-

टॉप स्पीड : 80 Km प्रतितास
सरासरी वेग : 34 Km प्रतितास
ट्रॅक गेज : मानक गेज – 1435 mm
इलेक्ट्रीफिकेशन : 25 kV, 50 Hz AC OHE
सिग्नलिंग: कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC)

हे आहेत स्टेशन्स :-

मेगापोलिस सर्कल, एम्बेसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज II, विप्रो फेज II, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, कृषी अनुसाधन, सकाळ नगर, विद्यापीठ, R.B.I., कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर आणि दिवाणी न्यायालय.

रूट मॅप पाहण्यासाठी : इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.