आजच्या काळात करोडपती होण्याचे तर प्रत्येकाचे स्वप्न आहे, पण काही मोजके लोकच हे स्वप्न पूर्ण करतात. तर अनेकजण नशिबाला दोष देत बसतात. असे होण्यामागील एक मोठे कारण आहे आर्थिक नियोजन. तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर सर्वप्रथम नोकरी लागताच आर्थिक नियोजन करून योग्य ठिकाणी गुंतवणूक सुरू करावी. बरेच लोक कमी पगार असल्याचे कारण सांगून गुंतवणूक करण्यास सुरुवात करत नाहीत आणि उत्पन्न वाढण्याची वाट पाहतात. आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते.
बचत करण्यासाठी रक्कम मोठी असण्याची गरज नाही, तुम्ही केवळ 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. एवढेच नाही तर केवळ 3000 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतुन तुम्ही स्वतःला करोडपती देखील बनवू शकता. आजच्या काळात, अशा अनेक स्कीम आहेत, ज्या तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देऊन कमी वेळेत धनवान करू शकतात. अगदी काही वर्षात तुम्ही १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करू शकता.
या विषयी बोलताना आर्थिक तज्ज्ञ शिखा यांनी सांगितलं की, गुंतवणुकीच्या दृष्टीने आजकाल अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, गेल्या काही काळापासून म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने चांगले परिणाम दिसून येत आहेत. एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली तर संपत्तीमध्ये वृद्धी होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.
तुम्ही 500 रुपयांसह देखील SIP सुरू करू शकता, शिवाय तुमचे उत्पन्न वाढले तर एसआयपीच्या रकमेत वाढ देखील करू शकता. एसआयपीमध्ये तुम्हाला चक्रवाढीचा लाभ देखील मिळतो, त्याचप्रमाणे यामध्ये सरासरी 12 टक्क्यांपर्यंत नफा मिळत असल्याचे दिसून आले आहे. तुमचे नशीब चांगले असेल तर कधी कधी तुम्हाला 15 ते 20% नफा मिळतो. एवढा चांगला लाभ सध्या कोणत्याही स्कीममध्ये मिळत नाही.
असा करा 3000 रुपयांवरून वरून 1 कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास..
जर तुम्ही SIP मध्ये दरमहा 3000 रुपये गुंतवत असला तर काही वर्षांतच तुम्ही 1 कोटीहून अधिक रुपये कमावू शकता. SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही 30 वर्षे सतत दर महिन्याला 3000 रुपये गुंतवले तर तुम्ही 30 वर्षांत एकूण 10,80,000 रुपये गुंतवाल. पण 12 टक्क्यांनुसार तुम्हाला 95,09,741 रुपये व्याज मिळू शकते. अश्याप्रकारे रु. 95,09,741 व्याज आणि रु. 10,80,000 गुंतवलेल्या रकमेसह, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी रु. 1,05,89,741 मिळतील.
महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक कराच..
आजच्या काळात मासिक 35 ते 40 हजार रुपये सहज कमावता येतात. अशा परिस्थितीत 3000 रुपयांची गुंतवणूक करणे फारशी अवघड गोष्ट नाही. पैशाच्या आर्थिक नियमानुसार तुम्ही गुंतवणुकीसाठी 50-30-20 हा नियम पाळला पाहिजे. या नियमानुसार, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत 20% रुपये गुंतवणुकीसाठी वापरले पाहिजेत.
या नियमानुसार, 15 हजार कमावणारी व्यक्ती 20 टक्के दराने गुंतवणुकीसाठी दरमहा 3000 रुपये नक्कीच काढू शकते. जर तुम्ही जास्त कमावले तर जास्त पैसे गुंतवून तुम्ही कमी वेळेत स्वतःला करोडपती बनवू शकता..